रत्नागिरी ; रत्नागिरी येथील रेल्वे स्थानकावर संस्थानिक बनलेल्या काही ठराविक रिक्षा चालकांकडून प्रवासी जनतेची भरमसाठ प्रवासी भाडे आकारून प्रचंड प्रमाणात राजरोस लुटमार सुरू आहे त्यामुळे येथे येणारी प्रवासी जनतेची अडवणूक करून वेठीस धरले जात आहे मात्र प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांचे त्याकडे कायम दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी जनतेत प्रचंड संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे रेल्वे स्थानकावरील रिक्षा चालक रिक्षा रांगेत उभ्या करून प्रवाशांना रांगेत थांबण्याचा आग्रह करतात मात्र नंबर आल्यावर कुठे जायचे आहे हे विचारून जवळच्या भाडे असल्यास स्पष्टपणे भाडे घेण्यास नकार देऊन तीस ते चाळीस रुपये च्या ठिकाणी दीडशे ते सव्वा दोनशे रुपये भाडे सांगून त्यांची अडवणूक करतात त्याचप्रमाणे शेअर रिक्षाने रत्नागिरी बस स्थानकापर्यंत जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांकडून प्रत्येकी 50 ते 60 रुपये भाडे आकारून एका वर्षात पाच ते सहा प्रवाशांना कोंबून रिक्षा प्रवास करण्याची सक्ती केली जाते जर कोणी प्रामाणिक रिक्षा चालक रांगे बाहेर थांबून वाजवी दरात जवळच्या अथवा लांबचे भाडे स्वीकारत असेल तर हेच संस्थानिक रिक्षाचालक टोळक्याने येऊन त्या रिक्षा चालकावर हल्ला करून रिक्षात बसलेल्या प्रवाशांना रिक्षा बाहेर जबरदस्तीने काढतात त्यामुळे प्रवाशांना या संस्थांनी रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारामुळे मनस्वी ताप होतो हे रिक्षा चालक ज्येष्ठ नागरिक अपंग अथवा आजारी प्रवासी कुणाचीही परवा करीत नाहीत केवळ मनमानी करून बाहेरून आलेल्या प्रवाशांची आर्थिक लुटमार करणे हाच त्यांचा एक कलमी हुकूमशाही कार्यक्रम बनलेला आहे मात्र आरटीओ आणि पोलीस कुणालाच या लुटमारीची आणि प्रवासी जनतेच्या गैरसोयीची गंभीरपणे दखल घ्यावी असे वाटत नाही यासंदर्भात रिक्षा फाट्यावरील पोलीस चौकीत तक्रार केली असता प्रवाशांना आरटीओंकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला जातो हाकेच्या अंतरावर असलेल्या रेल्वे स्थानकावर जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याची तसदी घ्यावी असे त्यांना वाटत नाही आरटीओ तर प्रवाशांना बेदखल करीत आहेत आज रत्नागिरी जिल्ह्यात आणि कोकणात देशी-विदेशी पर्यटकांचा ओढा निर्माण झालेला असून त्यांचे रत्नागिरीत आणि कोकणात अशाप्रकारे वेठीस धरणारे स्वागत संस्थानिक बनलेल्या रिक्षा चालकांकडून होत असेल तर येथे पर्यटन वाढणार कसे आणि बाहेरून इच्छिणाऱ्या प्रवासी जनतेत कोकणाविषयी वाईट संदेश जाऊन कोकणच्या पर्यटनाला ब्रेक लागण्याचा धोका निर्माण झाला आहे रिक्षा चालकांच्या या बेजबाबदार वर्तनाची गंभीर दाखल जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि आरटीओ यांनी तातडीने घेण्याची गरज आहे उर्मट आणि लूटमार करणाऱ्या रिक्षा चालकांवर तात्काळ कारवाई करण्याची प्रवासी जनतेची मागणी आहे आणि ही कारवाई कायमस्वरूपी सुरू राहण्याची गरज आहे.