अमित ठाकरेंविरोधात उद्धव गट उमेदवार देणार का?:आदित्य ठाकरेंनी थेट उत्तर टाळले; म्हणाले, जर-तरच्या अफवा आम्हीही ऐकतोय…

Spread the love

मुंबई- राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष उमदेवार देणार का? यावर आदित्य ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. अशा जर-तरच्या अफवा आम्हीही ऐकत असल्याचे आदित्य यांनी म्हटले आहे. सध्या मातोश्रीवर इच्छुकांची गर्दी आहे, पक्ष प्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत. गेला दीड महिना हे सुरु आहे. कोण कुठून कोणाच्या विरोधात लढणार हा वेगळा प्रश्न. माझ्यासमोर कोणीही असो, मी तयार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, या प्रश्नावर थेट उत्तर त्यांनी दिले नही.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य निवडणुकीच्या राजकारणात उतरू शकतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांच्या बैठकीत अमित ठाकरे यांच्या उमेदवारीवर चर्चा झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची मागणी केली. पक्षश्रेष्ठींची मागणी लक्षात घेऊन अमित ठाकरे यांनीही होकार दिल्याचे समजते, मात्र अंतिम निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावरच सोपवण्यात आला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य हे निवडणुकीच्या राजकारणात उतरणारा ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती होते. ते वरळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडूनही आले आहेत. उद्धव ठाकरे हे स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरी त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही तर ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्या वेळी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवारी किंवा प्रचार न करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला होता. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक लढवण्याची मागणी…

अमित ठाकरे यांना मुंबईतील माहीम, भांडुप किंवा मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची मागणी केली जात आहे. त्यावर अमित म्हणाले की, मी कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे. आता अमित ठाकरे निवडणूक लढवण्याचा अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. मनसे महाराष्ट्रात आणि मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. अमित ठाकरे हे शक्यता माहीम विधानसभा मतदार संघातून लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे नेते सदानंद शंकर सरवणकर या मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत.

ठाकरेंच्या घरातील आदित्य ठाकरे यांनीच लढवली निवडणूक..

ठाकरे कुटुंबातील अनेक सदस्य आता राजकारणात सक्रिय झाले आहेत, मात्र आतापर्यंत फक्त आदित्य ठाकरेंनीच थेट निवडणूक लढवली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते वरळी मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर ते अडीच वर्षे मंत्री राहिले. त्यांच्यानंतर आता अमित ठाकरे यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. अमित ठाकरे कोणता मतदारसंघ निवडणार? याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यांनी कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मनसेचे 2 उमेदवार घोषित…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. मनसेचे एकमेव आमदार असलेले प्रमोद ऊर्फ राजू पाटील यांना पुन्हा कल्याण ग्रामीण मतदारसंघातून तर ठाण्यातून अविनाश जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे कल्याण ग्रामीण या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांच्या 2024 च्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. त्या वेळी राज यांनी राजू पाटील आणि अविनाश जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा केली. या वेळी राज ठाकरे म्हणाले होते की, उमेदवारांच्या यादीवर शेवटचा हात फिरवला जातोय. आज किंवा उद्या उमेदवारांची यादी जाहीर होईल. यापूर्वीच मनसेने शिवडीतून बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांच्या नावांची घोषणा केली आहे. अमित ठाकरे कुठून लढणार याविषयी उत्सुकता कायम आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page