भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला ८ विकेट्सनीे पराभव स्वीकारावा लागला
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला ८ विकेट्सनीे पराभव स्वीकारावा लागला
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना न्यूझीलंडने ८ विकेट्सनी जिंकला. शेवटच्या दिवशी (२० ऑक्टोबर) न्यूझीलंडसमोर विजयासाठी १०७ धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी लंचपूर्वीच गाठले.
या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. उभय देशांमधील दुसरा कसोटी सामना २४ ऑक्टोबरपासून पुण्यात खेळवला जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक-
▪️भारत पहिला- ४६ सर्वबाद
▪️न्यूझीलंड पहिला डाव- ४०२
▪️भारत दुसरा डाव- ४६२
न्यूझीलंड दुसरा डाव- दोन गड्यांच्या मोबदल्यात ११० धावा करून सामना जिंकला.
न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला…
विशेष म्हणजे, न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारतीय भूमीवर कसोटी विजय मिळवला आहे. यापूर्वी नोव्हेंबर १९८८ मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला १३६ धावांनी पराभूत केले होते. एकूणच, न्यूझीलंडचा हा भारतीय भूमीवरील तिसरा कसोटी विजय ठरला.
न्यूझीलंडने भारतात पहिला कसोटी विजय १९६९ साली नागपुरात मिळवला होता. त्यावेळी किवींनी यजमान संघाचा १६७ धावांनी पराभव केला.
या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात केवळ ४६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ४०२ धावा केल्या. अशाप्रकारे न्यूझीलंड संघाला पहिल्या डावाच्या आधारे ३५६ धावांची मोठी आघाडी मिळाली.
त्यानंतर भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावात ४६२ धावा केल्या आणि किवीजसमोर १०७ धावांचे लक्ष्य ठेवले. न्यूझीलंड संघाला भारतीय भूमीवर आतापर्यंत एकही द्विपक्षीय कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. यावेळी दोन्ही संघांमध्ये १३वी कसोटी मालिका खेळवली जात आहे.
१०७ धावांचा पाठलाग करताना…
टीम इंडियाच्या १०७ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांना पहिल्याच षटकात कर्णधार टॉम लॅथमची विकेट गमावली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर लॅथम एलबीडब्ल्यू आऊट झाला. लॅथमने डीआरएस घेतला, पण तो वाया गेला. किवी कर्णधाराला आपले खातेही उघडता आले नाही.
यानंतर बुमराहने दुसरा सलामीवीर डेव्हन कॉनवेलाही एलबीडब्ल्यू आऊट केले. कॉनवेने ३ चौकारांसह १७ धावा केल्या. कॉनवे बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद ३५ अशी होती. येथून रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी किवीजला आणखी धक्का बसू दिला नाही. रचिन रवींद्र ३९ आणि विल यंग ४८ धावांवर नाबाद राहिले. रवींद्रने आपल्या खेळीत ६ चौकार मारले. तर यंगने ७ चौकार आणि एक षटकार लगावला.