मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्र.१५३ (चेंबूर विधानसभा) व स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माय मराठीला सन्मान मिळवून देणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त (२७ फेब्रुवारी ) “बाळगा मराठीचा अभिमान” या विषयावर इयत्ता १ ली ते ७वी च्या विद्यार्थ्यांना निबंध व इयत्ता ८ वी ते १० वी च्या विध्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेला प्रभागातील २५० पेक्षा अधिक विध्यार्थीनी सहभाग घेतला होता.चेंबूरमधील घाटला ,मरूमाता सभागृह या ठिकाणी सदर स्पर्धा पार पडली,ज्यात मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेतील काही निवडक चित्रांचे व निबंधाचे प्रदर्शन आणि बक्षीस वितरण येत्या १० मार्च रोजी तिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्साहात मनसे विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री.अमितसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करणार असल्याचे मनसेचे शाखाध्यक्ष श्री.रोहिदास जाधव यांनी सांगितले.
सदर प्रसंगीसौ.सविता खैरे (म.उपविभागअध्यक्षा) ,
श्रीमती.रेश्मा राऊत (महीला शाखाअध्यक्षा) , श्री.प्रणिल पडवळ (शाखा संघटक – जनहित विभाग) , श्री.सुरेंद्र किरडवकर (उपशाखाअध्यक्ष), श्री.महेश सडविलकर (उपशाखाअध्यक्ष), श्री.श्रीकृष्णा साळुंखे (उपशाखाअध्यक्ष) , श्री.शांताराम मेस्त्री (उपशाखाअध्यक्ष) , श्री.दिनेश पेंढारी (शाखासचिव), श्री.संजय मासये (समाजसेवक) तसेच प्रभागातील सर्व महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
जाहिरात :