विधान सभा निवडणूकीसाठी भाजपाकडून विक्रांत पाटील या युवा नेत्याकडे पनवेल ग्रामीण भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नुकताच विक्रांत पाटील यांचा शपथविधी पार पडला आहे.
युवा नेत्याला संधी, विक्रांत पाटलांनी घेतली आमदारकीची शपथ…
युवा नेत्याला संधी, विक्रांत पाटलांनी घेतली आमदारकीची शपथ युवा नेत्याला संधी, विक्रांत पाटलांनी घेतली आमदारकीची शपथ
पनवेल ग्रामीण: वडीलांकडून लोकसेवेचा वसा घेऊन राजकारणात आलेल्या विक्रांत पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली.भारतीय जनता पक्षाच्या राज्य महासचिव पदाची जवाबदारी पार पाडत असतानाच पक्षाने पाटील यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. यामुळे पनवेलमधील भाजपा कार्यकर्त्यांनमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी 12 आमदारांची नियुक्ती बऱ्याच वर्षांपासून रखडली होती. अखेर राज्यपाल नियुक्ती आमदारकीसाठी 12 पैकी 7 नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात पनवेल पालिकेचे माजी उपमाहापौर विक्रांत पाटील यांनाही संधी मिळाली आहे.महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला.यावेळी उपसभापती डॉ नीलम गोऱ्ह या विधानपरिषद सदस्यांना शपथ दिली.
महाराष्ट्राच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीसाठी विधीमंडळात जोरदार तयारी करण्यात आली होती. या आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली आहे.
राज्यपाल नियुक्त सात..
आमदारांमध्ये भाजपकडून चित्रा वाघ, विक्रम पाटील, धर्मगुरु महाराज राठोड या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादीकडून इंद्रीस नायकवाडी, पंकज भुजबळ यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीची संधी देण्यात आली आहे.
40 साव्या वर्षी आमदारकी…
1984 साली जन्मलेलं विक्रांत पाटील यांनी कमी वयात सामाजिक तसंच राजकीय क्षेत्रात काम करायला सुरवात केली. वडिलांच्या सानिध्यात राजकारणाचे बाळकडू मिळालेले विक्रांत यांनी पनवेल विध्यार्थी मोर्चाच्या अध्यक्ष पदापासून सुरवात करत भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्यकारणीचे अध्यक्ष पद आणि पनवेल पालिकेच्या नगरसेवक पदा सोबत पालिकेचे उपमाहापौर पदावर नियुक्त झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजपा राज्य कार्यकरणीचे महासचिव पद यशस्वीपणे पार पाडले.
आमदार प्रशांत ठाकूर यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा…
पनवेल विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानपरिषदेत संधी देऊन आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष विक्रांत पाटील यांना संधी देईल, अशी चर्चा पनवेल परिसरात होती. मात्र पक्षाने विक्रांत यांना विधानपरिषदेवर संधी दिल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांचा उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.