रत्नागिरी प्रतिनिधी- जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याच्या समोर बाळ माने यांनी स्पष्ट पणे आपली भूमिका मांडली. कदाचित यापुढे भाजप च्या बैठकीला बाळ माने जाणार ही नाहीत
आज भाजप पक्षाची बैठक जिल्हा कार्यालयात बोलवण्यात आली होती. विषय होता बूथ कमिटी तयार करून त्याच्या वर एक प्रमुख नेण्याबाबत जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत सह सर्व जिल्हा कार्यकारणी, महिला पदाधिकारी, युवक चे पदाधिकारी यांची बैठक पक्ष कार्यालयात सकाळी 11 ते 3 अशी लावण्यात आली होती.
आधी सगळ्यांना मोबाईल बंद करून बाजूला ठेवण्याची सूचना करण्यात आली. विषय निवडणुकीचा होता. पण तो बाजूला ठेवून बाळ माने यांनी स्वतः च सुरुवात करून सगळ्यांना स्पष्ट कल्पना दिली की माझा निर्णय झाला आहे. निर्णय झाला आहे असं सांगणं म्हणजेच त्याची पक्ष सोडण्याची तयारी झाली आहे.
एक भाजप चा कार्यकर्ता पक्ष सोडून जात असल्याचे पाहून सगळ्यांची मन हेलावली. काहींना तर अश्रू अनावर झालं. भाजप च्या पडत्या काळात बाळ माने यांनीच पक्षाला सावरलं. माजी आमदार असले तरी लोक त्यांना ओळखत आहेत. मूळ बैठकीचा विषय झालाच नाही.बाळ माने यांनी आपण पक्ष सोडणार असल्याचे कार्यकर्त्यांना सांगून टाकले.
दरम्यान सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार बाळ माने हे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती मध्ये दसरा मेळाव्यात प्रवेश करणार असून त्या वेळी त्याची उमेदवारी जाहीर केली जाणार आहे