पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासाला ‘मविआ’कडून ब्रेक- नरेंद्र मोदी यांचा मोठा आरोप…

Spread the love

काँग्रेसचे विचार नेहमी विदेशी राहिला आहे. ते दलित, मागस लोकांना आपले मानत नाही. त्यांनी बंजारा समाजाविषयी नेहमी दुप्पटी भूमिका घेतली. ज्यांना कुणी नाही पूजले त्याला मोदी पूजतो. आमच्या बंजारा समाजाने भारताच्या सामाजिक जीवनात भारताच्या निर्मितीत मोठी भूमिका बजावली आहेत.

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार असताना पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासाची योजना आणली होती. परंतु त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारने या योजनेला ब्रेक लावला. आता पुन्हा महायुतीची सरकार आल्यावर ही योजना सुरु झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. वाशिममध्ये बोलताना त्यांनी मविआ आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. प्रत्येक निवडणुकीत कर्जमाफीचं आश्वासन देणे हा काँग्रेसचा हातखंडा आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस आणि महाआघाडी सरकारने सिंचनाशी संबंधित अनेक कामे रोखून धरले होते. पण आमचे सरकार आले आणि ही काम सुरू केली.

वाशिमधून बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, हरियाणामध्ये मतदान होत आहे. हरियाणामधील लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. आज नवरात्रीत मला माता जगदंबेच्या मंदिरात त्यांचा आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य मिळाले. मी संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराजांच्या समाधीवर जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहे. मी या दोन्ही संतांसमोर नतमस्तक होत आहे. आज गोंडवाना राणी दुर्गावतीची जन्म जयंती आहे. गेल्यावर्षी त्यांची ५०० वी जयंती साजरी केली होती. मी दुर्गावतीला नमन करतो.

*काँग्रेसचे विचार नेहमी विदेशी..*

आपण २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. मला आज लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना मदत देता आली आहे. महाराष्ट्रातील ही योजना नारी शक्तीचे सामर्थ्य वाढवत आहे.

काँग्रेसचे विचार नेहमी विदेशी राहिला आहे. ते दलित, मागस लोकांना आपले मानत नाही. त्यांनी बंजारा समाजाविषयी नेहमी दुप्पटी भूमिका घेतली. ज्यांना कुणी नाही पूजले त्याला मोदी पूजतो. आमच्या बंजारा समाजाने भारताच्या सामाजिक जीवनात भारताच्या निर्मितीत मोठी भूमिका बजावली आहेत. कला, संस्कृती, राष्ट्र रक्षा, व्यापारात या समाजाजील महापुरुषांनी सर्व काही केले आहे.

काँग्रेसवर जोरदार टीका…

काँग्रेसला दलितांना दलित ठेवायचं आहे. गरीबांना गरीब करायचं आहे. त्यामुळे काँग्रेसपासून सावध राहा. अर्बन नक्षल काँग्रेसला चालवत आहे. काँग्रेसला देशाचे तुकडे करायचे आहे. त्यामुळे ते आपल्यात फूट पाडू पाहत आहे. त्यामुळे एक व्हा. ही वेळ एकत्र राहण्याची आहे. दिल्लीत हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले. त्याचा मुख्य आरोपी काँग्रेसचा नेता निघाला. काँग्रेस तरुणांना नशेत ढकलत आहे. त्या पैशापासून त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. आपल्याला सावध राहायचं आहे. इतरांना सावध करायचं आहे. सोबत मिळून लढायचं आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page