मुंबई उपनगरातील भाग प्रदूषण विरहित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्षाकडे मनसे रस्ते,आस्थापनांच्या मागण्या अन्यथा जनआंदोलनाचा इशारा ; समीर पोकले म.न.से

Spread the love

मुंबई : प्रतिनिधी (प्रणिल पडवळ)

पुर्ण मुंबईत प्रदुषणामुळे काही दिवसापासून मुंबईचा AQI (Air Quality Index) हा ३००च्या पार जाण ही गंभीर बाब आहे. AQI ३०० पार जाण म्हणजे आपली हवा विषारी झाली आहे आणि त्यामुळे जनतेला श्वसनाचे आणि त्या नंतर त्या आजाराचे रूपांतर दमा, खोकला, टि.बी,क्षय रोग असे आजार वाढत आहेत .

विभागातील हवेची गुणवत्ता सुधारावी तसेच नमुद विभागाला वायु / धुळ/ प्रदुषण / दुर्गंधी बाबत योग्य माहिती मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना – रस्ते साधन सुविधा व आस्थापना च्या वतीने
पुढील मागण्या करत आहोत.
1) विभागात स्थानिक प्रदुषणाचे स्त्रोत समजून घेण्यासाठी ठिकठिकाणी AQI मॉनिटर बसवावा.
२) प्रदुषणाचा सामना व व्यवस्थापन करण्यासाठी जनजागृती मोहीम घ्यायला हव्यात आणि वेळे आधिच हवामान गुणवत्तेनुसार आरोग्य सल्ला जाहीर करावा.
३) प्रदुषण आणि वातावरण बदलाचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने climate Action Plan तयार केला आहे. त्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी.
४) थर्मल पावर स्टेशन्सवर उत्सर्जित होणारा सल्फरडाय आॕक्साइड हा हवेच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे तो फिल्टर करणारे Fuel Desulfurization Units (FDGs) विभागात थर्मल पावर स्टेशनवर लवकरात लवकर बसवावेत असे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रस्ते , साधन सुविधा आस्थापना विभागाचे उपाध्यक्ष श्री.संतोष दगडू पार्टे व एम पूर्व विभागाचे प्रभाग संघटक श्री.समीर पोफले यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले यावर प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे

उपनगरातील सर्व नागरिकांनी व मुंबईकरांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी हि मनसेतर्फ विनंती

आज शांत बसाल तर उद्याच्या पिढ्या बरबाद होतील…

जाहिरात :

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page