संगमेश्वर / सुभाष लांजेकर प्रतिनिधी- एस टी महामंडळाचा भोंगळ कारभार वारंवार समोर येत आहे. रत्नागिरी- फुणगूस मार्गावरती एसटी महामंडळाची बस सेवा चालू आहे. परंतु बहुतेक वेळा एसटी बसला बोर्ड नसतो त्यामुळे प्रवाशांचे गाडी कोणती आहे ते कळत नाही. असा प्रकार वारंवार घडत आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून यापूर्वी एसटी महामंडळाला बोर्डही देण्यात आले आहेत. परंतु त्याचाही वापर वाहक चालक करत नाहीत यावरून एसटी महामंडळातील कर्मचारी किती हलगर्जीपणा करतात हे दिसून येते.
तसेच संगमेश्वर -डिंगणी -फुणगूस मार्गावरील संगमेश्वर डेपोच्या एसटी बस धावतात त्यांच्याही बोर्डची अशीच परिस्थिती असते असे प्रवासी सांगतात. वारंवार या घटना घडली एसटी महामंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे प्रवास करणे ही कठीण झाले आहे असे प्रवाशांचे म्हणणे आहे. शासन एसटी महामंडळाला प्रचंड मदत करते अनेक योजना शासनाने एसटी महामंडळाला दिले आहेत ज्याच्यातून एस टी महामंडळ तोट्यातून बाहेर येताना दिसत आहे असे असताना कर्मचाऱ्यांच्या वागणूक एसटी महामंडळाला तोटे मध्ये नेण्याचे काम करणार आहे त्यामुळे त्वरित कारवाई करून बोर्ड लावण्याचे आदेश हो मॅनेजर ने द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.