श्रीकृष्ण खातू /संगमेश्वर – एखाद्याला कोणती तरी आवड असते. गेले कांही वर्षे आवडीने योगाभ्यास करत असताना, त्याचा सराव तसेच इतरांना प्रोत्साहीत करून त्यात पारंगत होऊन अनेक योग आसने करण्यात तरबेज असलेले संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी गावचे सुपुत्र अलेटी वंत येथील दिलीप लक्ष्मण चव्हाण (झरेकर) यांनी२२ डिसेंबर. २०२३ रोजी सह्याद्री विद्या मंदीर भांडूप कोकणनगर येथे संपन्न झालेल्या योग कार्यक्रमात २ तास ७ मिनिटे ” सुप्त वज्रासनात” बसून जागतिक रेकॉर्ड करून आपले नांव कोरले आहे.
या योगाची दखल “गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड ” यांनी घेतली असून काल नुकतेच रितसर सर्टिफिकेट सुद्धा प्राप्त झाले आहे.
जगात आज लाखो लोक योगा शिकतात व इतरांना शिकवतात.पण आपण यापेक्षा वेगळे आहेत, ही ताकद आज जगासमोर दाखवून दिली आहे. व समस्त भांडूप वासियांचे योगाचार्य ठरले आहेत.
यामुळे आपला देश,राज्य, जिल्हा , गाव तसेच आपल्या समाजाचे नांव त्यांनी आपल्या कर्तृत्वाने लौकीक केले असून या रुपाने गावाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला असून भांडूपवासियांकडून व समस्त कळंबुशी वासियांकडून दिलीप चव्हाण यांचे अभिनंदन केले जात आहे.