मध्य रेल्वेवरील नेरळ पाडा गेट पाच दिवस बंद.नागरिकांचे हाल.पर्यायी मार्ग खड्ड्यात हरवला.ओव्हर ब्रीज रस्त्याची होतेय मागणी….

Spread the love

*नेरळ- सुमित क्षिरसागर –* मुंबई मध्य रेल्वेचे मेन लाईनवरील नेरळ पाडा येथे असलेले रेल्वेचे गेट काही तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी 26 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवले गेले आहे.आज सकाळ पासूनच हा गेट बंद झाल्याने परिणामी, नेरळ पूर्व आणि पश्‍चिम भागातील स्थानिक रहिवाशांची कोंडी झाली आहे.नेरळ कळंब या राज्य मार्गात महत्वाचा असलेला हा रेल्वे गेट असल्याने येथील राज्य मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली असून पर्यायी मार्गाने ही वाहतूक वळवण्यात आली, परंतु पर्यायी मार्गाचीच दूर अवस्था झाल्याने वाहनचालकांना मनस्ताप भोगावा लगतो त्यामुळे रेल्वे विभागाने लवकरात लवकर रेल्वेचे काम संपवून प्रवाशी नागरिकांना दिलासा द्यावा म्हणून मगणी होत आहे.तर ओव्हर ब्रीज रस्त्याची देखील होत आहे मागणी.


           
मुंबई कर्जत या मध्य रेल्वे वर नेरळ हे जंक्शन स्थानक आहे. या स्थानकात मेन लाईनवरील 86 किलोमीटर अंतर येथे मध्य रेल्वेचे फाटक क्रमांक 21 आहे. नेरळ पूर्व आणि पश्‍चिम भाग जोडणारा हा महत्वचा भाग असून राज्य मार्ग रस्ता या मार्गात मधून जात आहे.दरम्यान या राज्य मार्गातील रेल्वे गेट पन्नासहून अधिक  गाव वाड्या-पाड्यांना जोडणारा आहे,नेरळ मोठी बाजारपेठ आहे,शिवाय नोकरदार वर्गाला येथूनच प्रवास करावा लागत असून मोठ्या प्रमाणत या रस्त्यावरून वाहतूक होत असेत.दोन गावांना जोडणारा मधला रस्ता म्हणून हा गेट दुवा समजला जातो.मात्र आता हाच गेट बंद झाल्याने अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.नेरळ पेशवाई मार्ग पुढे दामत कर्जत कल्याण रस्त्याला जोडणारा पर्यायी मार्ग आहे तर दुसऱ्या बाजूला बोरले जिते असा पुढे आंबिवली गेट मार्ग कर्जत रस्त्याला जोडला गेला आहे,हे दोन्ही पर्यायी रस्ते तयार न केल्याने या मार्गाची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा कळायला मार्ग नाही.रस्त्याची फार बिकट दुरवस्था झालेली असून मान्सून मुळे हा अधिकच रस्ता नाले स्वरूपात दिसून येत आहे.त्यातच अवजड वाहनांची वाहतूक यामुळे प्रवाशी वाहन चालकांना डोके दुखी ठरत आहे.रोजची हजारो वाहने वाहतूक करीत असल्याने एखाद्या रुग्णास उपचारासाठी न्यायचे तर कसे नेणार हा देखील प्रश्न समोर आहे. गेले पाच दिवस रेल्वे विभागाने नेरळ रेल्वे पाडा गेट बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेतल्याने आता नागरिकांची पुरती गैरसोय होवू लागली आहे.एकूणच रेल्वे विभागाने लवकरात लवकर काम करून प्रवाशी वाहन चालकांना तसेच स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा म्हणून मागणी होत आहे.
          
दुसऱ्या बाजूला जर पाहिल्यास नेहमीच नेरळ पाडा या रेल्वे गेट येथे रेल्वे विभाग कामासाठी गेट बंद केले जात असल्याने आता येथे ओव्हर ब्रीज रस्त्ता नव्याने बांधण्यात यावा म्हणून मागणी होत आहे.राज्य मार्ग मध्ये असल्याने लाखो वाहने ये जा करीत असून नेरळ नागरीकरणामुळे झपाट्याने विस्तारित आहे.त्यामुळे रल्वेच्या मर्गिकेवर ओव्हर ब्रीज रस्ता झालास येथील वाहतूक कोंडी सुटेल,मोठी वाहने परस्पर बाहेरून मार्ग काढून निघून जातील,नेहमीची बनलेली ही समस्या कायमची सुटून नागरिकांना दिलासा मिळेल म्हणून ही मागणी पुढे येवू लागली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page