पुणे- देशात पुढच्या ५ वर्षांत डिझेल गाड्या दिसणार नाहीत, शंभर टक्के इलेक्ट्रिक बसेस दिसतील.मला विश्वास आहे, इंजिनियरचं संशोधन फार महत्त्वाचं आहे. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते पुण्यातील कार्यक्रमात बोलत होते. विश्वेश्वरैया यांची जयंती आपण अभियंता दिवस म्हणून साजरा करतो. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मना पासून खूप खूप अभिनंदन करतो. मी महाराष्ट्रात ज्यावेळी बांधकाम मंत्री होतो, त्यावेळी सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाची सुरुवात झाली तेव्हा माझ्या डिपार्टमेंटचे दोन सचिव होते, तांबे साहेब आणि देशपांडे साहेब.त्या दोघांवर मी जबाब दारी टाकली की, तुम्ही मेरिटवर वर कुणाच्याही प्रभावाखाली न येता ज्यांनी चांगलं काम केलं आहे, त्यांची निवड करा, असं नितीन गडकरी म्हणाले
ज्यावेळी त्यांनी सिलेक्शन केलं, त्यावेळचे तत्कालीन राज्यपाल डॉ. अलेक्झांडर साहेब यांना मी आमंत्रित करायला गेलो, मी त्यांना निमंत्रण दिलं तेव्हा त्यांनी विचारलं की, तुम्ही सिलेक्शन कसं केलं? मी त्यांना सांगितलं की, मला यातलं काहीच माहिती नाही. ही सर्व निवड प्रक्रिया आमच्या दोन्ही बांधकाम कामा च्या सचिवांनी केलं आहे. मी त्यांना सूचना केली होती की, कुणाचाही प्रभाव तुमच्यावर आला तरी चिंता करायची नाही. फक्त मेरीटवरच इंजिनियरची निवड करायची.मग देशपांडे आणि तांबे साहेबांनी अलेक्झांडर यांना सर्व निवड प्रक्रिया सांगितली. यानंतर अलेक्झांडर यांनी वेळ दिला आणि मोठ्या उत्साहात तो कार्यक्रम पार पडला, अशी आठवण नितीन गडकरी यांनी सांगितली.
विश्वेश्वरैया यांचं जीवन हे इंजिनियर्सकरता एक आदर्श आहे. कारण ते मुंबईत बांधकाम विभागात डेप्युटी इंजिनियर म्हणून रुजू झाले होते. काही दिवस धुळ्याला होते. त्यानंतर त्यांनी 1888 मध्ये छोटी सुरुवात केली. त्यांनी महाराष्ट्रात जवळपास 28 वर्षे काम केलं. त्यानंतर ते कर्नाटकात गेले. अनेक मोठमोठे ब्रिज, अनेक मोठमोठी धरणे बांधण्याची संधी त्यांना मिळाली. एक उत्तम प्रशासक, एक जिनियस इंजिनियर आणि विकासाच्या बाबतीत कमिटमेंट ठेवून काम करणारे दृष्टा ही त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण सर्वजण त्यांना अभिवादन करतो. त्यांची प्रेरणा, कर्तृत्व हे नक्कीच इंजिनियर्सला प्रेरणा देणारं ठरेल, असं नितीन गडकरी म्हणाले.