काँग्रेसचे खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात आरक्षण हटवण्याबाबत कथित वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्याचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चांगलाच समाचार घेतला. राहुल गांधींनी संविधानाचा अपमान केला आहे. त्यांना आरक्षण हटवण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवालही रामदास आठवले यांनी केला.
*नवी दिल्ली :* विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आरक्षण हटवण्याबाबत अमेरिकेत कथित वक्तव्य केलं. त्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेलं वक्तव्य संविधानाचा अपमान आहे. आरक्षण हटवण्याचा राहुल गांधींना काय अधिकार आहे? असा सवाल करत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.
https://x.com/AHindinews/status/1834644748214390990?t=Ry3DtQi0_ZQDaXqkca6sNQ&s=19
*राहुल गांधींनी केला संविधानाचा अपमान….*
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत गेल्यानंतर आरक्षण हटवण्याबाबत कथित वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांनी जोरदार समाचार घेतला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. अमेरिकेत जाऊन बोलण्याची काहीच गरज नव्हती. राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेलं वक्तव्य संविधान विरोधी आहे. हा संविधानाचा अपमान आहे. आरक्षण हटवण्याचा राहुल गांधींना काय अधिकार आहे. काँग्रेस पक्ष हा आरक्षणविरोधी आणि आदिवासी विरोधी आहे. या वक्तव्याबाबत राहुल गांधी यांनी आणि काँग्रेस पक्षानं मापी मागितली पाहिजे, असा जोरदार हल्लाबोल मंत्री रामदास आठवले यांनी केला.
*रिपाई करणार देशभरात आंदोलन…*
विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणावरील कथित वक्तव्याचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खरपूस समाचार घेतला. राहुल गांधींनी केलेल्या आरक्षणावरील वक्तव्याचा निषेध म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ( रामदास आठवले गट ) वतीनं देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.