हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. यंदा 2 सप्टेंबर रोजी श्रावण महिन्यातील शेवटचा ‘पाचवा श्रावणी सोमवारी’ आहे. श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावस्येमुळे सोमवती अमावस्याचा योगायोग तयार होत आहे. तर जाणून घेऊयात सोमवती अमावस्येच्या दिवशी काय दान धर्म करावं.
*मुंबई-* सोमवती अमावस्या तिथीला ‘पिठोरी अमावस्या असंही म्हणतात. महाराष्ट्रात या दिवशी ‘पोळा’ हा सण साजरा केला जातो. शेतकरी या सणाला बैलाची पूजा करून बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
*सोमवती अमावस्या वेळ :*
2 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजून 21 मिनिटांनी अमावस्या सुरू होईल आणि 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजून 24 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार सोमवारी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जाणार आहे.
*शुभ मुहूर्त-*
सोमवती अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममूर्त हा सकाळी 4 वाजून 38 मिनिट ते 5 वाजून 24 मिनिटापर्यंत आहे. पूजन मुहूर्त सकाळी 6 वाजून 9मिनिट ते 7 वाजून 44 मिनिटापर्यंत असणार आहे.
*काय दान करावं-*
अमावस्येच्या दिवशी दानधर्म केल्यानं शुभ फळ मिळतं, असं मानलं जातं. यंदा सोमवती अमावस्येच्या दिवशी नवीन वस्त्रे, हिरवे मूग, पन्ना, पितळेचे भांडे, कापूर आणि पुस्तकं दान करणं शुभ मानलं जातं. केतू महादशा टाळण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी लसूण, तीळ, घोंगडी, कस्तुरी, उडीद इत्यादी वस्तूंचं दान करणं शुभ आहे.