ब्रह्मकुमारीज तर्फे संगमेश्वर येथे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न!…

Spread the love

*संगमेश्वर:-* प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा देवरुख यांच्या वतीने राज योगिनी ब्रह्मकुमारी माधवी बहनजी यांच्या मार्गदर्शनाखाली  “रक्षाबंधन” हा कार्यक्रम संगमेश्वर परिसरात विविध ठिकाणी संपन्न झाला.
          

प्रथम सकाळी 11 वाजता एसटी स्टँड संगमेश्वर येथे वाहतूक नियंत्रक इंदुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षाबंधन करण्यात आले. यावेळी एसटी वाहक व चालक यांची उपस्थिती उत्तम लाभली. माधवी बहनजी यांनी  ‘राखी ‘चे महत्व विशद केले. व वाहक चालकांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
    

पोलीस ठाणे संगमेश्वर येथे हेड कॉन्स्टेबल विश्वास बरगाळे , हेड कॉन्स्टेबल किशोर जोयशी,
हेड कॉन्स्टेबल योगिता बरगाळे च्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला.  यावेळी पोलीस दल, पोलीस मित्र उपस्थित होते. बी.के. माधवी बहन जी यांनी राखीचे व अध्यात्मिक महत्व स्पष्ट केले.

त्यानंतर रामपेठ अंगणवाडी येथे अंगणवाडी सेविका पल्लवी शेरे व मदतनीस शीतल अंब्रे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन शेरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात येथे राबवले जाणा र्या उपक्रमांची माधवी बहनजी आणि प्रशंसा केली.

   

केंद्र शाळा संगमेश्वर नंबर दोन मध्ये शिक्षिका श्रीमती भिडे ,श्रीमती शेरे केंद्रप्रमुख जाधव व इतर शिक्षक वृंद यांना राखी बांधून माधवी बंजी यांनी राखीचा संदेश व स्लोगन पत्र देण्यात आले. व शाळेतील विद्यार्थ्यांना झाडे लावा झाडे जगवा हा पर्यावरण पूरक संदेश विद्यार्थ्यांना दिला.

त्यानंतर पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर येथे व्यापारी पैसा फंड  सोसायटीचेअरमन अनिल शेट्ये,, सेक्रेटरी धनंजय शेट्ये  यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन देव खामकर पर्यवेक्षक मोरगे शिक्षक वृंद व कर्मचारी यांना  राखी बांधण्यात आली .राखी सणाचे महत्व बी .कें. माधवी ब बहनजी यांनी सांगितले .     
                

यावेळी प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक खामकर यांनी माधवी बहनजी व शर्मिला रांजणे. समाज सेवक दिनेश अंब्रे यांचे यांनी आभार मानले. संगमेश्वर मध्ये सर्व कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षीप्रमाणे दिनेश अंब्रे यांनी केले. तसेच देवरुख येथे ठीक ठिकाणी रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page