एकनाथ शिंदे म्हणजे कंसमामा:उद्धव ठाकरे म्हणाले – एकीकडे बहिणींवर अत्याचार अन् दुसरीकडे हे कंसमामा राख्या बांधत फिरत आहेत…

Spread the love

*मुंबई-* बदलापूर लैंगिक शोषणाच्या मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महायुती सरकारवर विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली. एकीकडे राज्यात बहिणींवर अत्याचार होत आहेत आणि हे कंसमामा राज्यभर फिरून राख्या बांधून घेत आहेत. आपल्याला ही विकृती महाराष्ट्रातून हद्दपार करायची आहे, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी दादर येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेरील चौकात भर पावसात बदलापूरच्या लैंगिक शोषणाच्या घटनेविरोधात तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन केले. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिक उभे होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, अजूनही महाराष्ट्रात जिवंत मनं आहेत, हे तुम्ही दाखवून दिले. राज्यात सध्या घटनाबाह्य सरकार राज्य करत असून, त्याची मला किव येते. हे सरकार नराधमांवर पांघरून घालून त्यांना पाठिशी घालण्याचे काम करत आहे.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, एका बाजूला बहिणीवरती अत्याचार होतोय आणि एका बाजूला कंसमामा राख्या बांधत फिरत आहेत. आजचे आंदोलन विकृती विरुद्ध संस्कृतीचे आहे. यामुळे आता मी महामहीम राष्ट्रपतींना विनंती करतो, धूळ खात पडलेला ‘शक्ती कायदा’ अंमलात आणा अशी मागणी त्यांनी केली आहे.

सरकारमध्ये हिंमत नाही…

उद्धव ठाकरे म्हणाले की, बदलापूर प्रकरणी सरकारने खणखणीत बाजू घ्यायला पाहिजे होती. पण जेव्हा दारं बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावर उतरण्याखेरीज पर्याय नसतो. सरकार निर्लज्जपणे वागत आहे. ह्या सरकारला घालवावंच लागेल; आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल. सरकारमध्ये हिंमत नाही. गुन्हेगारांना ते पाठीशी घालत आहेत.निर्ढावलेलं सरकार आपल्यावर राज्य करत आहे.

तेव्हा बंदला विरोध नाही…

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी काल कोर्टाला धन्यवाद दिला. आपली केस सर्वोच्च न्यायालयात अडीच वर्ष सुरू आहे. न्याय मिळेल याचा विश्वास आहे. पण कोर्ट त्वरेने हलू शकतं हे काल कोर्टाने दाखवलं याचं अभिनंदन करतो. कोर्टाने ठरवलं तर निर्णय घेऊ शकतं. बंदला बंदी केली असली तरी राज्यातील प्रत्येक हृदयात तुमच्या विरोधात मशाल धगधगत आहे. महिलांना सुरक्षा पाहिजे म्हणून बंद केला. त्यात अडथळा आणला. गेल्या आठवड्यात भारत बंद झाला. इतर राज्यात रेल्वेही बंद झाल्या होत्या. तेव्हा याचिका कर्ते कुठे गेले होते. तेव्हा बंदला विरोध केला नाही.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page