*नवी दिल्ली:-* नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड अर्थात राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून केंद्र सरकारने २ लाख टन गैर-बासमती पांढरा तांदूळ मलेशियाला निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.
गेल्या वर्षी २३ जुलै रोजी देशांतर्गत पुरवठा मजबूत करण्यासाठी बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती.ही बंदी असली तरी काही देशांना त्यांच्या अन्न सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी अशा निर्यातीला सरकार परवानगी देते.
त्या आधारावरच हा बिगर बासमती पांढरा तांदूळ मलेशियाला निर्यात करण्यास सरकारने परवानगी दिली असल्याचे परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
भारताने याआधी नेपाळ,कॅमेरून,कोटे डी’आयव्होर,गिनी,मलेशिया,फिलीपिन्स आणि सेशेल्स या देशांना बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीला परवानगी दिली आहे.
राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड ही एक सहकारी संस्था आहे जी अनेक राज्यांमध्ये कार्यरत आहे.