राज्यांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होणार:288 मतदार संघातून ओबीसी उमेदवार देण्याची ओबीसी बहुजन पार्टीची घोषणा…

Spread the love

*मुंबई-* आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होणार असल्याचा दावा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील हे 288 विधानसभा मतदारसंघातून मराठा उमेदवार देण्याची घोषणा करत असतील तर आम्ही देखील 288 मतदार संघातून ओबीसी उमेदवार देणार असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे. इतकच नाही तर यासाठी 199 मतदारसंघात आमचा सर्वे देखील पूर्ण झाला असल्याची माहिती देखील शेंडगे यांनी दिली आहे.

राज्यभरात 57 लाख कुणबी दाखले घेऊन मराठा समाज ओबीसी मध्ये घुसला असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील करत आहेत. असे असताना देखील सरकार यावर काही बोलत नाही. यावरून देखील प्रकाश शेंडगे यांनी टीका केली. त्यामुळेच आता आगामी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार आम्ही केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको, अशी भूमिका कोणताच राजकीय पक्ष घेत नाही. म्हणून आता आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेंडगे यांनी म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह…

या वेळी प्रकाश शेंडगे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर देखील टीका केली. लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या सोबत प्रचार केला, प्रचार सभा देखील घेतल्या. मात्र, नंतर त्यांनी धंनदांडग्यांना पाठिंबा दिला, असा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. प्रकाश आंबडेकर यांनी सांगलीमध्ये माझा पाठिंबा काढून विशाल पाटील यांना दिला. तसेच दुसरीकडे बारामती मध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी या नावात नेमका कोण बसते? असा प्रश्न देखील शेंडगे यांनी विचारला आहे.

🔹️विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शेंडगे यांनी मांडलेले मुद्दे देखील पहा….

▪️ओबीसी बहुजन पार्टी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लवकरच एक जाहीर सभा देखील घेण्याचा विचार करत आहे.

▪️लवकरच महाराष्ट्राचा झंजावती दौरा निश्चित करून तारखा आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील त्या त्या मतदारसंघातील तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी त्या सर्व दौऱ्याचं नियोजन करावयाचे आहे.या दौऱ्या दरम्यानच आपण ज्या मतदार संघ निहाय बैठका घेणार आहोत त्यानुसार त्या त्या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची यादी तयार करून ती आपल्या राष्ट्रीय कार्यकारणाकडे सपुर्थ करायची आहे.

▪️सर्व पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रातील 288 विधानसभा आपण लढवणार आहोत या दृष्टिकोनातून तयारीला लागायचे आहे.

▪️ओबीसी आंदोलनाने मराठा आंदोलकांचा जो दबाव सरकारवर होता तो कमी झालेला आहे. त्यामुळे सरकार सगे सोयरे या विषयाचा अध्यादेश काढणार नाही, असं मला वाटतं. परंतु गाफील न राहता असाच दबाव आपण सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून लावून धरणार आहोत.

▪️याच आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसींच्या मध्ये जी नवचैतन्याची नांदी तयार झालेली आहे त्याचच रूपांतर आपण येत्या काळामध्ये मतदान रुपी करून घ्यायचा आहे त्यासाठी सर्वांनी तयारी रहायचं आहे.

▪️राज ठाकरे यांची आर्थिक निकषावरची आरक्षण देण्याची मागणी ही आम्हाला मान्य नाही. त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकरांनी जी वंचिताची व्याख्या केलेली आहे ती देखील आम्हाला मान्य नाही. प्रकाश आंबेडकरांनी वंचित म्हणजे काय हे प्रथमतः आम्हाला सांगावं त्यानंतर त्यांनी ओबीसी च्या हितावर बोलावं.

▪️जो ओबीसी हित की बात करेगा वही इस राज्य के राज्य करेगा, या भूमिकेतून आपल्या ओबीसी बहुजन पार्टी या पक्षासोबत काही समविचारी पक्ष येत असतील तर त्या वेळच्या परिस्थितीनुसार आपण त्यांच्याशी सुद्धा आघाडी त्या त्यावेळी करणार आहोत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page