ममुंबई : पत्रकार तथा कामगार नेते वैभव वीरकर यांची वडाळा शिवसेना विधानसभा उपविभाग समन्वयक पदी नियुक्ती पत्र देताना शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते देण्यात आले . गेले अनेक वर्षे वैभव वीरकर हे पत्रकार तसेच सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत, तसेच त्यांची कामगार संघटना असून सतत लोकांच्या व कामगार क्षेत्रातील प्रश्न सोडवत संपर्कात असतात यांचे सामाजिक कार्य बघून वीरकर यांचेवर शिवसेना वडाळा विधानसभा उपविभाग समन्वयक पदी निवड लोकसभेतील गटनेते व शिवसेना उपनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले, सोबत विभागप्रमुख गिरीश धानुरकर , सौ , कामिनी राहुल शेवाळे, वडाळा विधानसभा प्रमुख हरेश शिवलकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.