शिवराय मावळे प्रतिष्ठानच्या वतीने आबलोली येथे शिवजन्मोत्सव साजरा
चिपळूण : गुहागर तालुक्यातील आबलोली येथे शिवराय मावळे प्रतिष्ठानच्या तर्फे शिवजन्मोत्सव सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. या सोहळ्यात अनेक शिवप्रेमीं संघटना, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होते. सकाळी भाग्यलक्ष्मी प्रिंटीग प्रेस मध्ये शिवराय यांचे प्रतिमापूजन व बाईक रॅली काढण्यात आली. शिवराय मावळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुपारी लहान ‘गट’ मोठा ‘गट’ वकृत्व स्पर्धासह रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात आल्या. तब्बल २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तर रेकॉर्ड डान्स स्पर्धा ३८ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धकांचे क्रमांक वक्तृत्व स्पर्धा लहान गट वेदा विक्रांत पागडे,आरुष प्रदीप पांचाळ ,ओम प्रकाश नेटके, मोठा गट शरण्या सागर भडंगे, राम अर्जुन बिरादार,रुद्रांश रविंद्र कुळे,रेकॉर्ड डान्स स्पर्धा लहान गट झुळवा पाळणा ग्रुप (हिरण्या पालशेतकर, दुर्वा पवार , वेदांश, त्रिशा ),आसावरी पांचाळ ( गोंधळ )अक्षरा सावंत (एकविरा),विठू माऊली ग्रुप (निहार पांचाळ,मुस्कान पांचाळ,आसावरी पांचाळ,गौरंग पांचाळ,वैष्णवी पांचाळ,संग्राम पांचाळ,मोठा गट अस्मि रेपाळ (देशभक्तीपर गीत),वेसवची पारू ग्रुप ( निहार पांचाळ, साई,रेहान,सानवी,लावण्या,
आराध्या,कार्तिकी रेपाळ (माय भवानी) विशेष बक्षीस अंगणवाडी मधील सर्व मुले-भारताचे संविधान,नुरवी पांचाळ ( भगवा फडकला) या स्पर्धेत परीक्षक म्हणून अध्यक्ष रमेश पांचाळ, व्हिडिओ प्रणव, फोटो ग्राफी ऋषिकेश, यांनी काम पाहिले यावेळी सरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिवराय मावळे प्रतिष्ठानचे संस्थापक यांनी समाज प्रबोधन केले. शिक्षणाचे महत्व तसेच व्यसनाचे दुष्परिणाम आणि शिवराय प्रतिष्ठानचे उदिष्ट या विषयी प्रबोधन केले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून अंगणवाडी मुलांना रंगीत अंकलीपी, इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थी यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी
प्रतिष्ठानचे संस्थापक प्राध्यापक नितेश पांचाळ विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज मंडळ व महिला मंडळ चे अध्यक्ष रमेश पांचाळ, उपाध्यक्ष संजय पांचाळ, ज्येष्ठ अनंत पांचाळ, बंडू पांचाळ, रामचंद्र पांचाळ, दिलीप पांचाळ, राजाराम धामणस्कर ,सचिन कोतवडेकर, वैशाली पांचाळ, रसूताई धामणस्कर , दुर्वा पागडे.
निर्मल ग्रामपंचायत आबलोली सरपंच वैष्णवी नेटके व सदस्या पायल गोणबरे, प्रतिष्ठानचे सर्व सदस्य,वासुदेव पांचाळ गुरुजी, वाडीतील सर्व ज्येष्ठ मंडळी, शिक्षक वृंद, महिला तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन, , आभार नितेश पांचाळ यांनी केले.