पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा बारावा दिवस भारतासाठी अत्यंत निराशजनक दिवस होता. भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट, तिनं महिलांच्या 50 किलो कुस्तीच्या सामन्यात अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिचे वजन जास्त असल्यामुळं तिला अंतिम फेरीतून अपात्र ठरवण्यात आलं. आज तेराव्या दिवशी नीरज चोप्रा आणि भारतीय हॉकी संघाकडून पदकाच्या अपेक्षा आहेत.
*पॅरिस :* पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा बारावा दिवस भारतासाठी अत्यंत निराशजनक दिवस होता. भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट, तिनं महिलांच्या 50 किलो कुस्तीच्या सामन्यात अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिचे वजन जास्त असल्यामुळं तिला अंतिम फेरीतून अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळं कुस्तीत सुवर्णापदकाची अपेक्षा करणाऱ्या भारतीयांचं स्वप्न धुळीस मिळालं. पण आज तेराव्या दिवशी नीरज चोप्रा आणि भारतीय हॉकी संघाकडून पदकाच्या अपेक्षा आहेत.
*🔹️गोल्फ :* गोल्फपटू अदिती अशोक आणि दीक्षा डागर महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक प्ले राउंड-2 स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या दोन प्रतिभावान महिला गोल्फपटूंकडून प्रभावी कामगिरीची देशाला अपेक्षा आहे. गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेली अदिती अशोक यावेळी विजेतेपद मिळवेल, अशी आशा क्रीडा चाहत्यांना आहे.
▪️महिला एकेरी फेरी-2 (अदिती अशोक आणि दीक्षा डागर) – दुपारी 12.30 वाजता
ऍथलेटिक्स :
▪️महिलांची 100 मीटर हर्डल्स रिपेचेज फेरी (ज्योती यराजी) – दुपारी 02:05 वाजता
*🔹️कुस्ती :* अ गटातील पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो गटातील प्री-क्वार्टर फायनल कुस्तीचा सामना भारताचा अमन अमान आणि मॅसेडोनियाचा एगोरोव्ह व्लादिमीर यांच्यात होणार आहे. तर भारताची अंशु अंशू आणि यूएसएची हेलन लुईस मारोलिस यांच्यात गट ब महिला फ्रीस्टाइल 57 किलो गटातील प्री-क्वार्टर फायनल कुस्ती लढत होणार आहे.
▪️पुरुष फ्रीस्टाइल अ गट 57 किलो प्री-क्वार्टर फायनल (भारत विरुद्ध उत्तर मॅसेडोनिया) – दुपारी 2:30 वाजता
▪️महिला फ्रीस्टाइल ब गट 57 किलो प्री-क्वार्टर फायनल (भारत विरुद्ध यूएसए) – दुपारी 2:30 वाजता
*🔹️हॉकी :* हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाला मंगळवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळं त्यांना अंतिम फेरी गाठता न आल्यानं भारताच्या हातून सुवर्ण आणि रौप्य पदकं निसटली. आता भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे.
▪️पुरुष हॉकी कांस्यपदक सामना (भारत विरुद्ध स्पेन): संध्याकाळी 5:30 वाजता
*🔹️भालाफेक :* पुरुषांच्या भालाफेक गट-बी पात्रता सामन्यात भारताच्या नीरज चोप्राने 89.34 मीटर अंतर फेकून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.
▪️पुरुष भालाफेक अंतिम (नीरज चोप्रा) : रात्री 11:55 वाजता