*देवरूख-* संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील प्रबोधन शिक्षण संस्था संचलित, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या औषधी वनस्पती विभाग आणि फार्मसी पदविका विभाग, तसेच सह्याद्री संकल्प सोसायटी, संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण दिपकाडी आणि कातळ पठारावर येणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन या विषयावर कार्यशाळा आणि सदर कातळ पठारावर भेटीचे आयोजन केले होते.
कातळसडयावर फुलणाऱ्या असंख्य फुलांपैकी देवरूखच्या साडवली सड्यावर फुलणारी आणि सर्वांचे लक्ष वेधनारी दीपकाडी या बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. साडवली परिसरात पावसाळ्यातील केवळ १५ ते २० दिवस फुलणाऱ्या या फुलांच्या माध्यमातून एकूण सडे संवर्धनाची भुमिका पुढील पिढी पर्यंत नेणारा हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवला गेला. याप्रसंगी वनस्पतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. प्रताप नायकवडे, डॉ. अमित मिरगल आणि श्री प्रतीक मोरे, सहयाद्री संकल्प सोसायटी अध्यक्ष डॉ. शार्दुल केळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री. अक्षय मांडवकर, पर्यावरण प्रतिनिधी, महा एमटीबी यांनी दिपकाडी वरील त्यांनी तयार केलेला व्हिडिओ दाखवला. तसेच विद्यार्थ्यांना कातळ सड्यावर नेवून दीपकाडी संदर्भात वनस्पतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. प्रताप नायकवडे सर यांनी खूप चांगली माहिती सांगितली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. प्रा. वैष्णवी नलावडे, प्रा. निकुल पटेल, प्रा. वैष्णवी दुडये, प्रा. गणेश तुळसकर यांनी यात समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.