विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पोस्ट केली. तिनं 50 किलो कुस्तीची अंतिम फेरी गाठली होती. मात्र स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 50 किलो गटात तिचं वजन जास्त असल्याचं आढळून आलं.
*नवी दिल्ली :* भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र घोषित करण्यात आलं आहे. तिनं 50 किलो कुस्तीची अंतिम फेरी गाठली होती. मात्र स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 50 किलो गटात तिचं वजन जास्त असल्याचं आढळून आलं. विनेशला अचानक अपात्र ठरवल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विनेशच्या अपात्रतेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी विनेशच्या खेळाचं कौतुक केलं.
*काय म्हणाले पंतप्रधान मोदी-*
विनेशनं पदक गमावल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दुःख व्यक्त केलं आणि सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं, ‘विनेश, चॅम्पियन्समध्येही तू चॅम्पियन आहेस! तुम्ही भारताचा अभिमान आहात आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहात. आजचं अपयश दुखावतं. मला वाटत असलेली निराशा मी शब्दांत व्यक्त करु शकेन अशी माझी इच्छा आहे. शिवाय, मला माहित आहे की तुम्ही लवचिकतेचे प्रतीक आहात. आव्हानांना सामोरं जाणं हा तुमचा नेहमीच स्वभाव राहिला आहे. जोरदार पुनरागमन करा. आम्ही सर्व तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत.’
*काहीस वजन जास्त ठरल्यानं विनेश अपात्र-*
29 वर्षीय विनेश 50 किलो कुस्तीमध्ये अपात्र ठरली आहे. जेव्हा विनेशचं वजन थोडं वाढलं तेव्हा तिनं तो कमी करण्याचा प्रयत्न केला. सुवर्णपदकाची स्पर्धा आज (7 ऑगस्ट) होणार होती. मात्र तिचं वजन काहीस जास्त भरलं. विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर तिचं वजन 50 किलोच्या मर्यादेशी जुळत नसल्याचं सांगण्यात आलं. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं (IOA) देखील याबाबतची माहिती दिली आहे.