पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा नववा दिवस भारतासाठी संमिश्र होता, भारतीय हॉकी संघ जिंकला, तर लोव्हलिना बोर्गोहेनचा सामना गमावल्यानंतर बाहेर पडली. आता आम्ही तुम्हाला भारताच्या 10 व्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक सांगणार आहोत.
*पॅरिस :* पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा नववा दिवस भारतासाठी आनंद कमी पण दु:ख अधिक घेऊन आला, कारण भारतासाठी दोन मोठ्या पदकांचे दावेदार, लव्हलिना बोरगोहेन (बॉक्सिंग) आणि लक्ष्य सेन (बॅडमिंटन) यांनी आपापल्या लढती गमावल्या. भारतीय हॉकी संघानं पेनल्टी शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा पराभव करुन उपांत्य फेरीत धडक मारली.
*🔹️नेमबाजी :* पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या दहाव्या दिवशी अनंत जीत सिंग नारुका आणि महेश्वरी चौहान भारतासाठी स्कीट मिश्रित सांघिक पात्रता स्पर्धेत दिसणार आहेत. या स्पर्धेत एकूण 15 देशांचे संघ सहभागी होणार आहेत.
▪️स्कीट मिश्रित सांघिक पात्रता (अनंत जीत सिंग नारुका आणि माहेश्वरी चौहान) – दुपारी 12:30 वाजता
*🔹️टेबल टेनिस :* भारतीय खेळाडू टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यात अर्चना कामथ, मनिका बत्रा आणि श्रीजा अकुला भारतीय महिलांमध्ये दिसणार आहेत. महिला सांघिक स्पर्धेच्या 16व्या फेरीत आज भारतीय संघाचा सामना रोमानियन संघाशी होणार आहे.
▪️महिला सांघिक फेरी 16 – दुपारी 1:30 वाजता
*🔹️ऍथलेटिक्स :* भारतीय महिला ऍथलीट किरण पहल महिलांच्या 400 मीटर फेरी 1 मध्ये दिसणार आहे. याशिवाय अविनाश मुकुंद साबळे हा पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस फेरीच्या 1 मध्ये भारतासाठी दिसणार आहे.
▪️महिलांची 400 मीटर फेरी 1 – दुपारी 3:25 वाजता
▪️पुरुषांची 3000 मी स्टीपलचेस फेरी 1 – 10:34 वाजता
*🔹️बॅडमिंटन :* भारतासाठी बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या कांस्यपदकाच्या लढतीत लक्ष्य सेन दिसणार आहे. या सामन्यात तो मलेशियाच्या ली जी जियासोबत खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत लक्ष्य डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनकडून 2-0 असा पराभव पत्करुन सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला.
▪️बॅडमिंटन पुरुष एकेरी कांस्यपदक सामना (लक्ष्य सेन) – संध्याकाळी 6 वाजता
*🔹️सेलिंग :* आज ऑलिम्पिकच्या दहाव्या दिवशी, ॲथलीट विष्णू सरवणन पुरुषांच्या नौकानयन स्पर्धेत भारतासाठी दिसणार आहे. यासोबतच नेत्रा कुमाणन महिलांच्या नौकानयन स्पर्धेत आपलं कौशल्य दाखवणार आहे. हे दोघंही दहाव्या दिवशी रेस 7 आणि रेस 8 मध्ये सहभागी होतील.
▪️पुरुषांची डिंगी सेलिंग शर्यत 9 आणि शर्यत 10 (विष्णू सरवणन) – दुपारी 3:35 वाजता
▪️महिला डिंगी सेलिंग शर्यत 9 आणि शर्यत 10 (नेत्रा कुमाणन) – संध्याकाळी 6:10 वाजता