सरकारी दूरसंचार कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) लवकरच 5G सेवा सुरू करणार आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बीएसएनएलच्या 5 जी नेटवर्कचा वापर करून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
त्यांनी बीएसएनएलच्या 5G सेवा असलेल्या फोनवर व्हिडिओ कॉल केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केला. त्यामुळे लवकरच बीएसएनएल आता 5 जी सेवा सुरु करणार आहे. बीएसएनएलच्या या निर्णयामुळे इतर दुरसंचार कंपन्यांना तगडी टक्कर मिळणार आहे.
*BSNL 5G द्वारे सिंधिया यांनी केला व्हिडिओ कॉल*
BSNL ने भारतात आपल्या 5 जी सेवेची चाचणी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बीएसएनएल 5G नेटवर्कवर चाचणी दरम्यान व्हिडिओ कॉल केला आणि त्याचा व्हिडिओ X वर पोस्ट केला. पोस्टमध्ये, केंद्रीय मंत्री शिंदे यांनी लिहिले, “बीएसएनएलच्या 5G सेवा असलेल्या फोन कॉलची चाचणी करण्यात आली.” बीएसएनएल 5G नेटवर्कच्या चाचणीसाठी सिंधिया सी डॉट कॅम्पसमध्ये उपस्थित होते.
*बीएसएनएलला बजेटमधून 82 हजार कोटी रुपये मिळाले*
2024 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने बीएसएनएलला पुनरुज्जीवित करण्यासाठी 82 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी देण्याची घोषणा केली आहे.
या निधीचा वापर टेल्कोच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि संपूर्णपणे भारतात विकसित केलेल्या 4 जी आणि 5 जी तंत्रज्ञानाच्या रोलआउटला सुलभ करण्यासाठी केला जाईल. हे पाऊल भविष्यात खाजगी टेलिकॉम कंपन्यांसाठी तगडी टक्कर देणारे बनू शकते.
*एअरटेल आणि जिओच्या अडचणी वाढणार*
बीएसएनएल 5 जी सह भारतीय दूरसंचार उद्योगात एक नवीन लाट येणार आहे. त्यामुळे भारतीय टेलिकॉम मार्केटवर दबदबा निर्माण केलेल्या जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्यांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अलीकडेच रिलायन्स जिओ आणि एअरटेलने रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या, त्यानंतर सोशल मीडियावर बीएसएनएलच्या बाजूने खूप प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट दिसल्या होत्या. अनेक ग्राहकांनी आपले सिमकार्ड बीएसएनएलमध्ये पोर्ट केले होते.
*या शहरांमध्ये पहिली चाचणी*
एक देशांतर्गत दूरसंचार स्टार्टअप कंपनी BSNL सोबत बोलणी करत आहे जी BSNL च्या नेटवर्कचा वापर करून 5G सेवा देण्याची तयारी करत आहे. या कंपनीची चाचणी सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे.
ही चाचणी एक ते तीन महिन्यांत सुरू होऊ शकते. यामध्ये सार्वजनिक नसलेल्या नेटवर्कवर लक्ष केंद्रित केले जाईल. या प्रकल्पांतर्गत सुरुवातीला 700 मेगाहर्ट्झ बँड असलेल्या बीएसएनएलचा वापर केला जाईल. ही 5G चाचणी सुरुवातीला दिल्ली, बंगळुरू, चेन्नई सारख्या ठिकाणी घेतली जाईल.
*या ठिकाणी होतील चाचण्या!*
कॅनॉट प्लेस – दिल्ली
गव्हर्नमेंट इनडोअर ऑफिस – बंगळुरू, सरकारी ऑफिस – बंगळुरू, संचार भवन – दिल्ली,जेएनयू कॅम्पस – दिल्ली, आयआयटी – दिल्ली
इंडिया हॅबिटॅट सेंटर – दिल्ली,- गुरुग्राम.