पुणे महाराष्ट्र: शिवाजी महाराज नसते तर काय झाले असते हे आपण कल्पनाही करू शकत नाही. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या एका वाक्याची आठवण करुन दिली. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले होते की, देशाच्या इतिहासात शिवाजी महाराजांचे मोठे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची सीमा शोधण्यासाठी आपल्याला फार दूर जावं लागलं नसतं.
कदाचित आपल्या घराबाहेरच आपल्याला पाकिस्तानची सीमा पाहायला मिळाली असती. पुण्यातील आंबेगाव येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.