प्रियजन गुणगौरव समिती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्ट्या सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध
ठाणे मुरबाड प्रतिनिधी-लक्ष्मण पवार : मुरबाड तालुक्यात 1985 पासून प्रियजन गुणगौरव समिती सामाजिक क्षेत्रात काम करत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक दृष्ट्या सर्वतोपरी मदत करत आहे त्यातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुरबाड एमआयडीसी हॉल येथे दहावी व बारावी मध्ये गुणवत्ता मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार आयोजित केला होता .
21 व्या शतकामध्ये नवीन काही घडलं पाहिजे माझ्या मुरबाड मधला विद्यार्थी पायलट, वैज्ञानिक, इंजिनियर, खेळाडू, कल्पना चावला, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर , मदर टेरेसा झालेली / झालेला मला पाहायचा आहे .त्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी प्रियजन गुणगौरव समिती पाठीशी उभी राहून शैक्षणिक दृष्ट्या मदत करेल असे आयोजित विद्यार्थी सत्कार समारंभात राष्ट्रवादी अजित दादा पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यावेळी बोलत होते.
मुरबाड तालुक्यातील धसई, टोकावडे, सरळगाव, म्हसा परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य, सायन्स मध्ये प्राविण्य गुण मिळवले आहेत त्यांच्या सत्कार यावेळी करण्यात आला व्यासपीठावरून 40% गुण मिळवणारा 90 टक्के गुण मिळवणाऱ्यांना मार्गदर्शन करतो आहे भविष्यात 85 टक्के गुण मिळवणाऱ्यांनी राजकारणात आलं पाहिजे नवीन टेक्नॉलॉजी चा अभ्यास करून सर्व क्षेत्रात मुरबाड चा तरुण उभा राहिला पाहिजे नामवंत गुणवंत विद्यार्थी घडले पाहिजेत त्यासाठी त्यांना लागणारे सहकार्य प्रियजन गुणगौरव समिती करणार तसेच गुरुजन विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी एमपीएससी चे क्लासेस सुरू करून प्रयोजन गुणगौरव समिती मुरबाड मधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे प्रमोध हिंदुराव व्यासपीठावरून बोलत होते.
1985 पासून सामाजिक क्षेत्रात आम्ही सहभागी असून कधीच जातीपातीचा राजकारण केलं नाही तर समाजाला एकत्र आणण्याचे काम आम्ही नवरात्र उत्सव वाचा माध्यमातून केला आहे केलं मुरबाड मध्ये पहिले नवरात्र उत्सव प्रमोद हिंदुराव यांनी सुरू केलं असून विविध सांस्कृतिक खेळ मनोरंजनाची परंपरा गेल्या 40 वर्षापासून सुरू असून यावर्षी नवरात्र उत्सव जोमाने व नव्या उमेदीने सुरू करून विविध उपक्रम सुरू करणार असल्याचे प्रमोद हिंदुराव बोलत होते प्रमोद हिंदुराव यांनी 40 वर्षे समाज सेवेचे योगदान देऊन गोरगरिबांना सुखदुःखात मदत केली आहे त्यांना विधान परिषद विधानसभेत आमदार पाहण्याची इच्छा यावेळी अनेकांनी व्यक्त केली. संकट समई मदत करणारा लोकप्रतिनिधी प्रमोद हिंदुराव एकदा तरी विधानभवनात पाहण्याची मुरबाड करायची इच्छा असल्याचे उपस्थित आणि यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना साकडे घातले आहे. यावेळी व्यासपीठावर अजित दादा पवार राष्ट्रवादी पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत गोंधळी, युवक जिल्हा अध्यक्ष प्रतीक हिंदुराव, तालुका अध्यक्ष चंद्रकांत बोष्टे, मुरबाड शहर अध्यक्ष महेश जाधव ,सौरभ हिंदुराव, बाळाराम कोर, बाळू भोईर, दिलीप शेळके, बापू मार्के ,महिला अध्यक्षा घोलपताई ,विलास जाधव, तालुका महिला अध्यक्षा दलवी मॅडम इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते