मुंबई- रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स पुरस्कार संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्टिट्यूटला सुप्रसिध्द अभिनेता सोनू सूद यांच्याहस्ते अबुधाबी येथे प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स हा भारतीय उद्योजकांच्या उत्कृष्टतेचा आणि नवोन्मेषाचा गौरव करण्यासाठी समर्पित एक प्रतिष्ठित उपक्रम आहे. भारतातील विविध क्षेत्रातील व्यवसायिकांना या पुरस्कारामुळे प्रेरणा मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. यावेळी प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद आणि चित्रांगदा सिंग तसेच उद्योग, मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.