दिवा : कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतिथीनुसार सोमवारी सकाळी किल्ले दुर्गाडी (कल्याण) वरुन शिवज्योत आणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करुन शिव उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर दिव्यात शिवप्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढून ढोलताशांच्या गजरात जल्लोश करत अनेक शिवभक्त जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या
दिवा दातिवली तिसाई नगर येथे शिवसेना कार्यालय जवळ मोठ्या प्रमाणावर शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. निलेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य आरोग्य शिबीर व इतर तापासण्या तसेच चक्रीय भजनाच्या कार्यक्रमही दिव्यातील जनतेसाठी संध्याकाळी ठेवण्यात आला होता. मानवकल्याण हॉस्पिटल मार्फत डॉक्टर पराद जोशी यांच्या देखरेखे खाली नागरिकांना मोफत वैद्यकीय औषधे देण्यात आली.
मा. ऊपमहापौर रमाकांत मढवी, नगरसेवक दिपक जाधव, अमर पाटील, शैलेश पाटील तर नगरसेविका दिपाली उमेश भगत, दर्शना म्हात्रे, सुनिता मुंडे, अर्चना पाटील तर उपविभाग प्रमुख चरणदास म्हात्रे, उमेश भगत, विनोद मढवी, गणेश मुंडे यांचे तेव्हा सत्कार करण्यात आले. शिवसेनेच्या दिला दातिवली शिवसेना शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेत हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला. दातीवली शाखाप्रमुख निलेश म्हात्रे यांनी या सर्वांचे आभार मानत या वर्षाप्रमाणे दरवर्षी अशीच तिथीनुसार शिवजयंती उत्साहात व जल्लोषात शिवजयंती साजरी करु असे सांगितले.
जाहिरात :