नेरळ – कल्याण राज्य मार्गाची दुर अवस्था सा .बा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, अपघात झाल्यास कोण जबाबदार ?..

Spread the love

🔹️कर्जत – कल्याण राज्य मार्गाची जीर्ण , छिद्र आणि अनियमिता दुरूस्ती करण्यासाठी सदर ठेका प्राप्त ठेकेदाराकडून मे महिन्यात बिट्युमिनस काँक्रीट ( बी सी ) मिक्सचे काम करण्यात आले होते. परंतू सुरू असलेल्या पावसामुळे सदर राज्य मार्गाची अक्षरशा: दुरअवस्था झाली असुन, या कडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने एखाद्या वाहानाचा आपघात होऊन जिवितहानी झाल्यास याला नेमके जबाबदार कोण? ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग की वाहानचालक असा प्रश्न मात्र उपस्थित होत आहे.

कर्जत – कल्याण राज्यमार्ग हा कर्जत ते वडवली पर्यंत हा सिमेंट काँक्रीटचा तयार करण्यात आला आहे. तर वडवली ते रायगड जिल्हयाची हद्द असलेले डोणे पर्यंत हा रस्ता डांबरी करणाचा आहे. या डांबरी रस्त्त्याच्या झालेल्या जीर्ण , छिद्र आणि अनियमिता दुरूस्ती ही ठेका प्राप्त ठेकेदाराकडून मे महिन्यात बिट्युमिनस काँक्रीट ( बी सी ) मिक्सचे काम करण्यात आले होते. मात्र ठेकेदारानी सदर जीर्ण , छिद्र आणि अनियमिता दुरूस्तीकरीता वापरलेले बिट्युमिनस काँक्रीट ( बी सी ) मिक्स हे निकृष्ठ दर्जाचे वापरले असल्याने व या करण्यात आलेल्या निकृष्ठ कामाचे पितल हे सध्या सुरू असलेल्या पावसामुळे उघडे केले आहे. तर सध्या सुरू असलेल्या पावसामुळे ठेकेदारानी वापरलेले बिट्युमिनस काँक्रीट ( बी सी ) मिक्स हे अक्षरशा: वाहून गेले असल्याने, नेरळ एक नंबर नाका ते हॉटेल रेड चिल्ली व नेरळ विद्या मंदिर शाळा ते दामत रस्त्यावर कच व छोट्या मोठया खड्यांचे साम्राज्य पसले असल्यामुळे या रस्त्त्यावरून वाहनचालकाना व दुचाकीस्वर यांना आपला जीव मुठीत घेवुन प्रवास करावा लागत आहे. तर हॉटेल रवांडा चारफाटा येथील हॉटेल टी वाले येथील रस्त्याची ठेकेदारानी डागडुजीचे काम केले नसल्याने या ठीकाणी वाहतुककोंडी होत असुन, रस्त्यावर पसरलेली कचवरून किंवा पडलेल्या छोट्या मोठया खड्यांमुळे एखाद्या वाहन किंवा दुचाकीचा घसरून अपघात होण्याची व जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, व सदर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग उरण कडे वर्ग केला असल्याने आता या संदर्भात नागरिकांनी तक्रार करण्यासाठी उरणला जावे का? व ठेकेदार हा उरण तालुक्यामधील अल्याने मुख्य कार्यकारी अभियंता पनवेल यांनी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्ता ठेकेदाराचे लाड पुरवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांच्या कडे वर्ग केला आहे का? असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तर सदर दुरअवस्था झालेल्या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने एखादा आपघात होऊन जिवितहानी झाल्यास याला नेमके जबाबदार कोण? ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग की वाहानचालक असा प्रश्न मात्र उपस्थित होत आहे.

🔹️प्रतिक्रिया-

नेरळ एक नंबर नाका नेरळ माथेरान जोड रस्ता येथील वळणाच्या व उतारा असलेल्या ठिकाणी रस्त्त्याच्या निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे पसरलेली कच व पडलेल्या खड्यांमुळे एखाद्या दुचाकीला किंवा चारचाकी वाहनाला अपघात होऊन जिवितहानी झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत हदीतील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग उरणकडे वर्ग करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल कार्यालयाच्या मुख्य कार्यकारी अभियंता यांना जबाबदार धरले जाईल. संबधीत विकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई मुख्य कार्यकारी अभियंता यांनी त्वरीत करावी…
▶️संदीप उतेकर, शिवसेना ठाकरे गट नेरळ शहर उपाध्यक्ष..

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page