
देवरुख- देवरूख मार्लेश्वर मार्गावरील निवे खुर्द येथे गुरांची अवैध वाहतुक करणारा टेम्पो सकल हिंदू समाजाच्या सतर्कतेमुल्ये मंगळवारी पकडण्यात आला आहे. टॅम्पो, दोन पाडे देवरूख पोलीसांनी जप्त केले असून दोन जणांवर देवरूख पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरांची अवैध वाहतूक रोखणे हे पोलिसांसमोर एक आव्हान आहे. रत्नागिरी येथील पशुहत्येची घटना ताजी असताना संगमेश्वर तालुक्यात गुरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला आहे.
या घटनेची खबर प्रमोद शिंदे, रा.देवरूख यांनी देवरुख पोलीस ठाण्यात दिली आहे. संतोष बंडु चव्हाण व श्रीराम बापु तळप दोघेही रा.मलकापुर अशी संशइत आरोपींची नावे आहे. प्रमोद शिंदे हे भाडे घेवून मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास निव्याहून देवरूखच्या दिशेने येत होते. निवे येथे टॅम्पो मध्ये दोन पाडे बांधलेले त्यांना दिसून आले. याची माहिती शिंदे यांनी भाजपा तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांना सांगितली. यानंतर सकल हिंदु समाज एकत्र आला.
हा प्रकार देवरूख पोलीसांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. पोलीसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. आरवली येथील हे पाडे घेवून कत्तल करण्याच्या उद्देशाने कोल्हापुर दिशेने जात असल्याचे पुढे आले. टेम्पो चालकाकडे गुरे वाहतुकीचा परवाना नव्हता. यामुळे सकल हिंदु समाज बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली. अवैध गुरे वाहतुकीचा प्रकार हा वेळीच थांबला पाहिजे, दोषींची कसून चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
पोलीसांनी दोन पाडे, टेम्पो जप्त केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव करीत आहेत. गुरांची अवैध वाहतूक घटनेत दिवसागणिक वाढ होत असल्याचे चित्र आहे. सकल हिंदू समाजाने सदैव जागृत राहणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.