जरांगेंचा सरकारला इशारा, उपोषण स्थगित
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा ८ जूनपासून मनोज जरांगे जालन्यातील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहे. जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. कालपासून मनोज जरांगेंची तब्येत ढासळली आहे. यामुळे लोकप्रतिनिधींचा धावाधाव सुरू आहे. पण अखेर भाजप आमदार गिरीश महाजनांनंतर आता सकंटमोचक बनून सरकारच्यावतीने शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे आणि शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई जरांगेच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत गेले आहेत. भुमरे आणि देसाईंची जोडी जरांगेंच्या आंदोलनस्थळी पोहचले त्यांचा मनधरणीला यश आले आहे. सरकारच्यावतीने गेलेल्या देसाईंनी जरांगेंसोबत संवाद साधला आणि अखेर जरांगेंनी फक्त देसाई आलेत म्हणूण उपोषण मागे घेत आहे असे म्हणत उपोषण सोडले आहे.
मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवून द्या अशी चर्चा झाली. सगेसोयरेची मागणी पुर्ण करण्यासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ द्या अशी विनंती देसाई यांनी जरांगेंना केली आहे. तसेच उद्या लगेच तातडीने सीएम शिंदेंकडे बैठक लावतो अशी ग्वाही देसाईंनी दिली आहे. मराठा समाजासाठी भरपूर केलंय आता थोडे राहिले ते लगेच पूर्ण करण्याचे आश्वासन देसाईंनी दिले आहे. तुम्ही इथे यायालाच नको होते असे थेट जरांगेंनी भुमरे आणि देसाईंना सुनावले आहे.