रत्नागिरीकडे जाताना दुचाकीचा अपघात युवकाचा मृत्यू

Spread the love

राजापूर :- गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नाटे येथून रत्नागिरीकडे जात असताना सागरी महामार्गावर धाउलवल्ली येथील एका वळणावर झालेल्या दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू झाला .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत झालेल्या युवकाचे नाव उबेद बाग ( २१ ) असे असून जखमी अन्य दोघांवर रत्नागिरी येथे उपचार सुरू आहेत . पल्सर मोटर सायकलने रत्नागिरीकडे निघालेल्या या मुलांचा बऱ्याच वेळानंतर ही फोन न आल्याने रात्री साडेअकराच्या सुमारास नातेवाईकांनी मोबाईल वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद येत होता . त्यामुळे घरच्या लोकांनी शोधाशोध केली असता रात्री अडीज वाजण्याच्या सुमारास धाउलवल्ली फाटा येथे एका वळणावर हे युवक मोटरसायकलसह अपघातग्रस्त स्थितीत आढळून आले . यातील एक युवक जागी मृत झाला होता तर अन्य दोघे गंभीर जखमी होते . दोघांना तात्काळ रत्नागिरी येथे हलविण्यात आले . मोटरसायकल स्वारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page