दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणा…

Spread the love

२५ मे/पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची आतुरता होती. मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाच्या तारखेबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेचा निकाल ४ जून पर्यंत लागणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानंतर, मात्र शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेतील विधानामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन चर्चेला उधाण आले होते. मात्र महाराष्ट्र बोर्डाच्या वतीने आज निकालाच्या तारखेबद्दल अधिकृत सूचना जाहीर झाल्यानंतर सगळ्या चर्चाना आता पूर्णविराम लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळविलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. परवा, सोमवारी २७ मे २०२४ रोजी दुपारी १.०० वाजता १० वी बोर्ड परीक्षांचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहेत.

दहावीचा निकाल https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gove.in
https://results.targetpublications.org या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त वेबसाईट्सवरून उपलब्ध होतील व या निकालाची प्रिंट आऊटही घेता येईल. याशिवाय, यंदा दहावीच्या Digilocker app मध्ये डिजिटल गुणपत्रिका (Digital Marksheet) उपलब्ध करून देण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page