मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे.देशात आता हुकूमशाही सुरू झालीय, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून घोषित करावं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
केंद्रीय निवडणूक आयोगानं आज, शुक्रवारी शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिला. हा निर्णय आल्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, निवडणूक आयोग, भाजप, एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं आहे.उद्धव ठाकरे म्हणाले की, हा अन्याय आहे. देशात हुकूमशाही सुरू झाली आहे, हे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून घोषित केलं तर चांगलं होईल. लोकशाही तर आता देशात राहिलेली नाही. ज्या पद्धतीने हा निर्णय दिला आहे, ते बघता आम्ही निवडणूक आयोगाकडे लाखोंच्या संख्येने कागदपत्रे, पुरावे दिले होते, पण तरीही फक्त आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या जोरावर पक्षाचे नाव आणि चिन्ह कुणाला द्यायचे हे निश्चित केले. हा अन्याय आहे.पक्ष आणि राज्यातील जनता माझ्यासोबत आहे. त्यामुळे मी वारंवार आव्हान देत आलो आहे की हिंमत असेल तर मैदानात या, निवडणूक घ्या. निवडणुका घेण्याची हिंमत यांच्यात नाहीच. आता कदाचित येणाऱ्या दोन-तीन महिन्यांत ते निवडणुकांच्या तारखाही घोषित करतील, अशी शक्यताही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
जाहिरात :