मुंबई ,शिवाजी पार्क- शिवाजी पार्क मैदानावरती माननीय नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर मुंबईतील सहा उमेदवारांसाठी सभेसाठी उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या भाषणाच्या सुरुवात नेहरूंच्या पासून केली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असेही त्यावेळी सांगितले. नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास बोलायला पाहिजे विरोधक निवडून येणार नाहीत त्यामुळे त्यांच्यावर बोलून आपला वेळ फुकट दगडूची काय गरज नाही असे यावेळी त्यांनी सांगितले. तीन तलाक मुंबई गोवा हायवे यासह मुंबईतील महत्त्वाच्या विषयावरती आपल्या भाषणामध्ये राजसाहेबांनी आवर्जून उल्लेख केला.
राज ठाकरेंच्या मोदींकडून अपेक्षा..
अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर मराठी भाषेला तो दर्जा मिळेल, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
देशावर मराठा सम्राज्य होते. त्याचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात शिकवला जावा, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हेच त्यांचे खरे वारस आहेत. त्यामुळे त्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन व्हावी, आणि त्यांचे संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
मुंबई गोवा हायवे 18 19 वर्षापासून काम चालू आहे तो पूर्ण व्हावा…
गेली 18-19 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग खड्ड्यांनी भरलेला आहे. तो रस्ता चांगला व्हावा, अशी अपेक्षा देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला तुम्ही कधीही हात लावणार नव्हता. मात्र, विरोधक तसा प्रचार करत आहेत. मुस्लिम समाज देखील आपल्या बरोबर आहे. त्यामुळे हा देश कायमचा सुरक्षित करा, अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईच्या रेल्वे यंत्रणेवर जास्तीत जास्त लक्ष द्यावे, त्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली…
मोदी पंतप्रधान होते, म्हणून राम मंदिर झाले..
मोदीजी तुम्ही होता, त्यामुळे अयोध्येत राम मंदिर झाले, असे म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतूक केले. राज ठाकरे यांनी या वेळी कार सेवकांचा उल्लेख करत, त्यावेळी घडलेल्या घडामोडींच्या आठवणी सांगितल्या. कलम 370, तिहेरी तलाक अशा मोदींच्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांची पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नावाने भाषणाला सुरूवात…
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नंतर तिसऱ्यांदा हिंदूस्तानाचे पंतप्रधान होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, असा उल्लेख करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकविस वर्षांपूर्वी सभेची आठवण देखील राज ठाकरे यांनी काढली.