अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळताच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी मोदी सरकारवर त्यांनी निशाणा साधला. केजरीवाल काय म्हणाले? वाचा सविस्तर…
नवी दिल्ली-11 मे 2024-
आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंज केजरीवाल यांना अंतिरिम जामीन मंजूर केला आहे. 1 जूनपर्यंत केजरीवाल जामीनावर असणार आहेत. काल जामीन मिळाल्यानंतर आज केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. भारत माता की जय… इन्कलाब जिंदाबादचा नारा देत केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. आपल्या पक्षावर आणि देशावर बजरंगबलीची कृपा आहे. आमचा पक्ष लहान आहे . दहा वर्षांचा आहे. पण आमच्या पक्षाला संपवण्यासाठी पंतप्रधानांनी सगळे मार्ग वापरले. चार नेत्यांना जेलमध्ये पाठवल्यावर यांना वाटलं पक्ष संपेल. पण आमचा पक्ष म्हणजे विचार आहे… असं म्हणत केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेतून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो…
आता मी देशभर फिरणार आहे. माझं तर मन धन देशासाठी कुरबान आहे… माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी अर्पण करणार आहे. माझ्या शरिरातील रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी मी देणार आहे. दिवसात 24 तास असतात. पण मी मी 36 तास काम करेन, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
नरेंद्र मोदींना प्रतिप्रश्न…
नरेंद्र मोदी इंडिया आघाडीला विचारतात की तुमचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? पण मी त्यांना विचारतो, तुमच्याकडे कोण आहे? भाजपमध्ये 75 वर्षानंतर निवृत्ती घेतली आहे… लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांना निवृत्त केलं. पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला मोदी निवृत्त होत आहेत. मग भाजपला मी विचारतो प्रधानमंत्री पदाचा दावेदार कोण आहे? जर यांच सरकार आलं तर योगीना डावलून अमित शाह यांना पंतप्रधान केलं जाईल.अमित शाह मोदींची गॅरंटी पूर्ण करणार का?, असं सवाल केजरीवाल यांनी केला आहे.
देशात आघाडी सरकार येणार- केजरीवाल…
तुरुंगातून बाहेर आल्यावर गेल्या 20 तासात मी देशभरातल्या अनेक लोकांशी बोललोय त्यावरून असा अंदाज येतो की 4 जून नंतर भाजपचं सरकार बनणार नाही. सगळ्या राज्यात भाजपच्या जागा कमी होणार आहेत. याच्या 220 जागा येऊ शकतात. त्यामुळे केंद्रात यंदा इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. आप पक्ष केंद्रातील सरकारमधील घटक असेल, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.