मुंबई : प्रतिनिधी (प्रणिल पडवळ)
रांझणा, तनु वेड्स मनु, निल बटे सन्नाटा अशा सिनेमांमधून जिने तिच्या अभिनयच ठसा उमटवला अशी स्वरा भास्कर. स्वराने काल गुपचूप कोर्ट मॅरेज करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पण स्वराने आधी तिच्या नवऱ्याला भाऊ मानलं होतं. हो.. बरोबर वाचताय. स्वराने तिचा नवरा फहादला आधी भाऊ मानलं होतं. लग्न झाल्यावर स्वराचं एक जुनं ट्विट व्हायरल होतंय.
फहादचा जेव्हा वाढदिवस होता तेव्हा स्वरा शुभेच्छा देताना म्हणाली होती कि.. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा फहाद मियाँ! भाऊ तुमचा आत्मविश्वास अबाधित ठेवा, फहाद अहमद सुखी राहा, सेटल व्हा.. म्हातारे होत आहात, आता लग्न करा! मित्रा, वाढदिवस आणि वर्ष खूप चांगले जावो.” अशा शब्दात स्वराने फहादला शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे स्वराने फहादला आधी भाऊ मानलं होतं आणि आता थेट त्याच्याशीच गुपचूप लग्न केलं
ताई..ताई दोघे मिळून खाऊ मिठाई?
स्वरा भास्करने २०१० मध्ये गुजारिश या हिंदी फिल्म पासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पुढे आनंद एल राय यांच्या २०११ मध्ये आलेल्या तनु वेडस् मनू सिनेमातील तिच्या भूमिकेनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. स्वरा ही दिल्लीतील मिरांडा हाऊसमधून पदवीधर झालेली आहे. याशिवाय तिनं जेएनयु विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. स्वरा तिच्या वादग्रस्त पोस्ट्स मुळे आणि राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर करत असलेल्या टीका टिप्पणीमुळे कायम चर्चेत राहिली आहे
जाहिरात :