नात्यातील सुरेख संवादासाठी जोडीदाराची विवेकी निवड आवश्यक – महा. अनिस राज्य सरचिटणीस कृष्णात कोरे

Spread the love

खेड : व्हॅलेंटाईन डे हा तरुण-तरुणीच्या मनातील  प्रेम व्यक्त करण्यासाठी आवडता दिवस आहे.या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा खेड व ज्ञानदीप महाविद्यालय मोरवंडे-बोरज ता. खेड जि. रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने  कॉलेज मध्ये जोडीदाराची विवेकी निवड या संवाद  शाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या संवाद शाळेसाठी प्रमुख संवादक म्हणून राज्य सरचिटणीस कृष्णात कोरे, अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य उमेशकुमार बागल ,रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गोवळकर, जोडीदाराची विवेकी निवड राज्य कार्यवाह हर्षल जाधव, कोल्हापूर अंनिस जिल्हा प्रधान सचिव रेश्मा खाडे, व अमृता जाधव खेड शाखा कार्याध्यक्ष सचिन शिर्के, प्रधान सचिव राजपाल भिडे, सर्व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयीन  विद्यार्थी उपस्थित होते.

 यावेळी  विद्यार्थ्यांना  हर्षल जाधव व रेश्मा खाडे यांनी प्रेम व आकर्षण यातील फरक, जोडीदाराची विवेकी निवड का ? जोडीदाराची विवेकी निवडीची पंचसुत्री यात प्रेम व आकर्षण यातील फरक समजून घेणे, बौद्धिक भावनिक आणि मुल्यात्मक अनुरुपता पाहणे, हुंडा पत्रिका व व्यसनाला नकार, लग्न साधेपणाने व किमान कर्ज न काढता, जात व धर्म विरहित विवाहाची शक्यता यावर मांडणी केली.

तसेच राज्य सरचिटणीस कृष्णात कोरे व अमृता जाधव यांनी मी कसा ? मी कशी ? माझ्या अपेक्षा, आवडी निवडी, सहजीवन की संसार, सहजीवन व संसार यातील फरक, जात अश्या विविध गोष्टींवर सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला .

जर महाराष्ट्र अंनिस प्रेमविवाह व पसंतीचा कार्यक्रम याला फाटा देत असेल तर जोडीदार निवडीचा पुढील पर्याय म्हणजे परीचयोत्तर विवाह पद्धतीने विवाह व्हावेत असे देखील सांगते. यासाठी पारंपरिक पत्रिकेला फाटा देऊन नवीन बारा गुणांची पत्रिका वापरण्याचा आग्रह धरावा असे मुलांना सांगण्यात आले. या नवीन पत्रिकेत परस्पर पसंती, जबाबदारी पेलण्याची क्षमता, हुंडा विरोधी, वय वजन उंची पगार याला जास्त महत्त्व न देणे, असणाऱ्या सवयी व्यसने, आवडी निवडी, स्वभाव, सुदृढता, परिपूर्ण माहिती, विचारसरणी, भविष्यातील स्वप्ने, वैद्यकीय तपासणी या बारा गुणांचा समावेश करण्यात आला आहे. यातील प्रत्येक गुण जुळतीलच असे नाही पण जास्तीत जास्त जुळावेत यावर विवेकी विचाराने विचार करावा असे सांगण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचा उद्देश  व प्रस्ताविक रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गोवळकर यांनी केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page