नवी मुंबई : कामोठे येथील मोनिका किरण घाग ही भारताच्या पहिल्या एम.एम.ए मिक्स मार्शल आर्टस् रियालिटी शो वारीअर्स कुमते हंटची विजेती ठरली आहे.मोनिका घाग हिला तीन वर्षांच्या कारारसह पाच हजार डॉलर्सचे रोख बक्षीस अभिनेता सुनील शेट्टी यांच्या हस्ते देण्यात आले आहे, तसेच तिला जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
एमक्स प्लेअर या प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफार्म प्रेक्षेपीत झालेल्या भारतातील एम.एम.ए मिक्स मार्शल आर्टस् रियालिटी शो वारीअर्स कुमते १ हंटची सीजन १ ची टायटल बेल्टची प्रथम विजेती आहे, मोनिका घाग रायगड जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वैयक्तिक मेडल मिळवून देणारी पहिली महिला असून तिने २ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे, तसेच वूशु या खेळामध्ये तिने राज्यस्तरावर रायगडला सुवर्ण पदक व साऊथ एशियन ब्राझिलीयन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत भारताला सुवर्ण पदक मिळून दिले आहे.
यापुढे मोनिका घाग ही संयुक्त अरब अमिराती मध्ये होणाऱ्या के-१ आशियाई चॅम्पियनशीप मध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
जाहिरात :