चिपळूण : सावर्डे परिसरातील जनता तसेच आजूबाजूच्या गावचे नागरिक पो.नि.भरत धुमाळ यांच्या त्रासाबाबत त्रस्त असून त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे पोलीस अधिक्षकांकडे केली आहे,
सावर्डे पो.नि.भरत धुमाळ हे मनमानी अंधाधुंदी कारभार करीत आहेत, निव्वळ श्रीमंतांना मानसन्मान देऊन गोरगरीब जनतेला व कायद्याला पायदळी तुडवून सामान्य रयतेवर अन्याय करत आहेत, कोणत्याही विषयी कारवाई करावयाची असल्यास किंवा थांबवायची असल्यास त्यांच्याकडून हेतुपुरस्कर मोठ्या रकमेची मागणी होते, त्यामुळे चिपळूण तालुक्यातील सामान्य जनतेच्या पिळवणूक होत असून पोलीस वर्दीला कुठेतरी डाग लागण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे,
पो.नि.भरत धुमाळ यांच्या संपत्तीची सखोल चौकशी केल्यास सावर्डे येथून त्यांनी किती माया संपत्ती गोळा केली हे समजू शकेल त्यामुळे त्यांची बदली न करता कायमस्वरूपी कामावरून बडतर्फ करावे कारण एका ठिकाणावरून गेल्यावर दुसऱ्या ठिकाणीही तेच करणार असा अधिकारी सामान्य जनतेचे रक्षक जर भक्षक झाले तर सामान्य जनतेने कुणाकडे दाद मागावी ?
या मुजोरीपणाला तात्काळ ग्रहविभाग खात्याने तात्काळ आळा घालावा व तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा सामान्य रयतेवर पो.नि.भरत धुमाळ यांच्या सारखे अधिकारी अन्याय करीत राहतील यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे
जाहिरात :