मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर छापा, छापेमारीत काय सापडले?

Spread the love

मुंबई : गिनिज बुकमध्ये नोंद असलेला मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालाच्या मालकाला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई क्राईम ब्रँचने मुच्छड पानावालाच्या खेतवाडीतील दुकानात छापेमारी केली
छापेमारी दरम्यान पोलिसांना त्याच्या गोदामाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोदामातही छापा टाकला. या छापेमारीत 15 लाखाची ई-सिगारेट हस्तगत करण्यात आली आहे. मुच्छड पानावालाचा मालक शिवकुमार तिवारी याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. क्राईम ब्रँचने शाळा आणि महाविद्यालयांजवळ विकल्या जाणाऱ्या ड्रग्ज आणि ई-सिगारेटवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन आठवड्यात अंमली पदार्थ विरोधी सेल (ANC) आणि समाजसेवा शाखा (SSB)ने केलेल्या अनेक ऑपरेशन्समध्ये, हजारो ई-सिगारेट आणि कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे.
एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ई-सिगारेट विक्रीचे चार गुन्हे नोंदवले गेले, ज्यामध्ये मुच्छड पानवालाचा मालक शिवकुमार तिवारीच्या अटकही झाली. खेतवाडी परिसरातील त्याच्या गोदामासह पान दुकानावर छापा टाकण्यात आला.

या छाप्यात निकोटीन आणि तंबाखूची चव असलेल्या शेकडो ई-सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा 2019 च्या कलम 7, 8, आणि 9 अंतर्गत जप्ती करण्यात आली असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुच्छड पानवाला हे मुंबईतील प्रसिद्ध पान शॉप आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी, मुंबईतील अनेक प्रसिद्ध उद्योगपती आणि टेक टायकून येथे पान खाण्यासाठी येतात. हे दुकान मुंबईत 70 च्या दशकापासून सुरू आहे आणि आता त्याचे नाव खूप प्रसिद्ध आहे. त्यांची स्वतःची वेबसाइट देखील आहे. हे पान शॉप ऑनलाइन फूड ऑर्डरिंग पोर्टलवरही ऑर्डर घेते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page