राशीभविष्य
मेष : आज ठरविलेले काम आजच करून घ्या. मुलांनी दिलेला सल्ला उपयुक्त ठरेल. धंद्यात फायदा होईल.
वृषभ : प्रकृतीची काळजी घ्या. खाण्या-पिण्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता आहे. धंदा नीट सांभाळा.
मिथुन : महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मोठेपणा मात्र करू नका. जुने स्नेही भेटतील.
कर्क : विचारांना प्रेरणा मिळेल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. धंद्यातील तणाव कमी होईल.
सिंह : आजचे काम आजच करा. राजकीय-सामाजिक कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल. आनंदी रहाल.
कन्या : घरगुती वातावरण चांगले, आनंदी ठेवणे तुमच्या हातात आहे. चमचमीत पदार्थ मिळतील.
तूळ : धंद्यात काम वाढेल. जुने स्नेही भेटतील. मानप्रतिष्ठेचा प्रश्न मुळीच करू नका.
वृश्चिक : आजचे काम करण्याचा आळस करू नका. सहनशीलता ठेवा. रागावर ताबा ठेवा.
धनु : आजचे काम उद्यावर टाकू नका. नोकरीत वरिष्ठांचा रोष होऊ शकतो. रस्त्याने नीट चाला.
मकर : मुलांच्या कामाने त्यांना योग्य तो मान मिळेल. महत्त्वाच्या विषयावर चर्चा सफल होईल.
कुंभ : दूरच्या प्रवासाचे ठरवाल. घर खरेदी-विक्रीत फायदा होईल. कला क्रीडा क्षेत्रात ओळख होईल.
मीन : कामाचा ताण वाढेल. स्पर्धा जिंकाल. आर्थिक फायदा होईल. सावधपणे चाला.
जाहिरात :