नवी मुंबई : कल्याणला जाणाऱ्या ऐरोली-काटयी ऐलीव्हेटेड रोडला नवी मुंबईत (Navi Mumbai ) एन्ट्री आणि एग्झिटच नाही. ऐरोली येथे ठाणे बेलापूर हायवेला एन्ट्री न दिल्याने नवी मुंबईतील वाहणांना या हायवेचा वापर करून मुंबईला जाता येणार नाही. शिवाय एग्झिट न दिल्याने मुंबईतून आलेल्या वाहणांना ऐरोलीत उतरतां येणार नाही. एन्ट्री आणि एग्झिट नसल्याने या हायवेचा नवी मुंबईकरांना काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे या एलिव्हेटेड हायवेला ऐरोलीत एन्ट्री आणि एग्झिट न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजप आमदार गणेश नाईक यांनी दिलाय.
ऐरोली – काटईनाका एलिव्हेटेड रोडचे काम प्रगतीपथावर आहे. राज्य सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून मुंबईला थेट कल्याणशी जोडणारा हा रस्ता आहे. हा रस्ता नवी मुंबईतील ऐरोली मार्गे जात आहे. 1400 कोटी रूपये खर्च करून 12 किलोमीटरचा हा हायवे तयार करण्यात येत आहे. ऐरोली खाडी पुलावरून सरळ एलिव्हेटेड हायवे हा नागरी वस्तीवरून पारसिक हिल डोंगरात बोगदा पाडून थेट कल्याणला जात आहे. परंतु, ऐरोली येथे ठाणे बेलापूर हायवेला एन्ट्री न दिल्याने नवी मुंबईतील वाहनांना या हायवेचा वापर करून मुंबईला जाता येणार नाही. तसेच एग्झिट न दिल्याने मुंबईतून आलेल्या वाहनांना ऐरोलीत उतरता येणार नाही. या कामाची आज आमदार गणेश नाईक यांनी पाहणी केली. यावेळी एन्ट्री आणि एग्झिट पॉईंट नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. नवी मुंबईकरांना देखील या रस्त्याचा वापर व्हावा यासाठी एन्ट्री आणि एग्झिट देण्यात यावी अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी दिली. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल आणि या रस्त्याचे काम बंद पाडू असा इशारा यावेळी गणेश नाईक यांनी दिलाय.