ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.
▪️मेष :
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. व्यापार – व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. दिवसभर आनंदाचं आणि खेळीमेळीचं वातावरण राहील. गृहसजावटीत काही नावीन्य आणाल. घर सुशोभित करण्यासाठी व्यवस्था बदलाल. वाहनसौख्य मिळेल. सामाजिक कार्यासाठी प्रवास होतील. रमणीय स्थळाच्या प्रवासाचा आनंद उपभोगू शकाल.
▪️वृषभ :
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज आपण व्यापार वृद्धीवर आपले लक्ष केंद्रित कराल. नवीन योजना वापराने व्यापार प्रगतीच्या दिशेने वाढत जाईल. मात्र, कामात यश मिळण्यास विलंब होईल. दुपार नंतर व्यापारातील परिस्थिती अनुकूल होईल. कामा निमित्त प्रवास करावा लागण्याची सुद्धा शक्यता आहे. पदोन्नती होईल. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे वरिष्ठ आपणावर खुश होतील. वडीलधार्यांकडून लाभ संभवतात.
▪️मिथुन :
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज आपल्या आहाराकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकल्यानं नैराश्यातून बाहेर पडू शकाल. अवैध कामे करून अडचणीत सापडण्याचा शक्यतेमुळं त्यापासून दूर राहणं हितावह होईल. अचानकपणं प्रवास करावा लागेल. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. नैराश्य दूर होऊ शकेल. लेखन, साहित्यीक प्रवृत्तीमध्ये रस घ्याल. व्यापारात विकासाच्या दृष्टीनं नव्या योजना अंमलात आणू शकाल. वरिष्ठांशी वाद संभवतात.
▪️कर्क :
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज आपण एखाद्याशी भावनात्मक नात्याने जोडले जाल. आनंद आणि मनोरंजनात्मक प्रवृत्तीमुळं मन प्रफुल्लित राहील. त्यात मित्रांचे सहकार्य मिळाल्यानं मनोरंजनाचा आनंद द्विगुणित होईल. दुपारनंतर तब्बेत बिघडू शकते. वाहन जपून चालवा आणि रागावर नियंत्रण ठेवा. शब्द जपून वापरा. नवीन कार्य सुरू करायला आजचा दिवस प्रतिकूल आहे.
▪️सिंह :
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस व्यापार विस्ताराच्या दृष्टीने आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. व्यावसायिकांना त्यांच्या हाताखाली असणार्या लोकांकडून व्यावसायिक लाभ होतील. धनप्राप्ती संभवते. व्याज, दलाली इत्यादी मार्गांनी प्राप्तीत वाढ होऊन आर्थिक विवंचना दूर होईल. चांगले कपडे, स्वादिष्ट भोजन यामुळं मन प्रफुल्लित होईल. एखादा प्रवास संभवतो.
▪️कन्या :
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. वस्त्र आणि अलंकारांची खरेदी आनंददायी राहील. कलेत विशेष आवड निर्माण होईल. व्यापारातील विकासामुळं मनास आनंद होईल. आजचा दिवस व्यवसायासाठी अनुकूल आहे. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
▪️तूळ :
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. कुटुंबात वाद संभवतात. दुपारनंतर स्वास्थ्य लाभेल. सृजनशील गोष्टींकडं लक्ष द्याल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे.
▪️वृश्चिक :
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस व्यावसायिकांना अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण होईल. स्थावर संपत्ती संबंधित कामाचे सुद्धा निराकरण होऊ शकेल. भावंडांशी जवळीक साधू शकाल. दुपारनंतर कामात प्रतिकूलता जाणवेल. शारीरिक आणि मानसिक व्यग्रता याचा अनुभव येईल. सामाजिक क्षेत्रात अपयश येईल. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. धनहानी संभवते.
▪️धनू :
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज संभाव्य मतभेद टाळण्यासाठी उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवावे लागेल. दिवसभर मनात गूढ आणि रहस्यमय विषयांचे विचार येतील. विद्यार्थ्यांना लेखन- वाचनात एकाग्रता ठेवावी लागेल. दुपारनंतर काळजी दूर होण्याचे उपाय मिळतील. मानसिक शांतता अनुभवाल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
▪️मकर :
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आज प्रत्येक कार्य विना विघ्न पार पडेल. दांपत्य जीवनातील वातावरणात कटुता निर्माण होईल. गूढ विषयांत गोडी निर्माण होईल. कार्यालयात आपला प्रभाव पडेल. दुपारनंतर मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील. मनात निराशेचे ठग दाटतील. निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. घरातील कामासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता. शेअर बाजारात यशस्वीपणे गुंतवणूक करू शकाल.
▪️कुंभ :
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज आपल्यातील धार्मिक भावना उफाळून येईल. आज एखाद्या धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. कोर्ट- कचेरीच्या कामात यश मिळेल. पुण्यकार्यासाठी पैसा खर्च होईल. मनःशांतीसाठी केलेल्या प्रयत्नांत यशप्राप्ती होईल. दुपारनंतर आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. दांपत्य जीवनात गोडवा राहील. शरीर स्वास्थ्य सुद्धा चांगले राहील.
▪️मीन :
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज शेअर-सट्टा ह्यातून काही आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कुटुंबात सुख- शांती लाभेल. रमणीय ठिकाणी प्रवासाला जाल. मित्रां कडून लाभ होईल. दुपारनंतर काही कारणाने मानसिक चिंता राहील. धार्मिक कार्यावर अधिक खर्च होईल. प्राप्तीच्या प्रमाणात खर्चाचे प्रमाण जास्त राहील. घरातील वातावरण शांतिदायक राहील.