नेरळ/ प्रतिनिधी- नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील आर्डे येथून यशवंत काथोद देसले यांचे कन्स्ट्रक्शन साईडवरून सुमारे ५२ लोखंडी सेटींगच्या प्लेटी चोरीला गेल्या होत्या. सुमारे १ लाख रुपयांचा हा माल चोरट्यांनी लंपास केला होता. त्यामुळे काथोद यांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. यानंतर या प्रकरणात यश मिळणे तसे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते. मात्र नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी कसब पणाला लावले. यात सुमारे ५० सीसीटीव्ही कॅमे-यांची पडताळणी करून पोलीसांनी अंबरनाथ येथून ०३ आरोपींना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपी फारूख नुरमोहम्मद शहा वय १९ वर्षे, सलमान आयात उल्ला शहा वय १९ व शहजाद अब्दुल सलाम भट वय २२ वर्षे सर्व रा.अंबरनाथ यांनी गुन्हा कबूल केला. दरम्यान यात गेलेला माल देखील पोलिसांनी हस्तगत गेला आहे.
नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांचे मार्गदर्शनाखाली नेरळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक लींगप्पा सरगर, पोलीस शिपाई दवणे, वांगणेकर यांनी गुन्हयातील आरोपी शोधण्यासाठी ४० ते ५० सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज संयम व चिकाटीने चाळत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबद्दल नेरळ पोलिसांचे कौतुक होत आहे. तर ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, पोलीस उपनिरीक्षक लिंगाप्पा सरगर, सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे, पोलीस हवालदार नवनाथ म्हात्रे, खंडागळे, पोलीस शिपाई दवणे, केकाण व वांगणेकर यांनी महत्वाची महत्त्वाची भूमिका बजावली आहे.