प्रतिनिधी | मुंबई/ हिंगोली- खासदार हेमंत पाटील यांच्या हिंगोलीतील शेकडो समर्थकांनी मंगळवारी रात्री मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन पाटलांची उमेदवारी कायम ठेवा, अशी आग्रही मागणी केली. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.
खासदार हेमंत पाटील यांच्या हिंगोलीतील शेकडो समर्थकांनी मंगळवारी रात्री मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन पाटलांची उमेदवारी कायम ठेवा, अशी आग्रही मागणी केली. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.समर्थकांचा ‘वर्षा’वर ठिय्या, मात्र एकनाथ शिंदे हतबल दिसून येतात.हिंगोलीत बाबूराव कदम, यवतमाळला हेमंत यांच्या पत्नी राजश्री उमेदवार
नकारात्मक सर्व्हेचा धाक दाखवून भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकत शिंदेसेनेच्या ४ खासदारांची तिकिटे कापण्यास भाग पाडले, तर आणखी दोन खासदारांवर टांगती तलवार आहे. वायव्य मुंबईत गजानन कीर्तिकर व रामटेकचे कृपाल तुमाने या दोघांना आधीच तिकीट नाकारण्यात आले.नंतर पहिल्या यादीत नाव जाहीर झालेले हिंगोलीचे हेमंत पाटील व वेटिंगवर असलेल्या यवतमाळच्या भावना गवळी यांच्याही नावावर फुली मारण्यात आली. हिंगाेलीत बाबूराव कदम कोहळीकर, तर यवतमाळमध्ये राजश्री पाटील शिंदेसेनच्या उमेदवार असतील. खासदार हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या पत्नी राजश्रींना त्यांच्या माहेरी उमेदवारी दिल्याचे सांगितले जाते.
उद्धवसेनेची दुसरी यादी…
मुख्यमंत्री पुत्राशी कल्याणमध्ये लढणार वैशाली
उद्धवसेनेने चार उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहीर केली. यापूर्वी त्यांनी १७ उमेदवार जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात कल्याणमध्ये ठाकरेंनी वैशाली दरेकरांना उमेदवारी दिली. २००९ मध्ये त्यांनी मनसेच्या तिकिटावर १.०२ लाख मते घेतली होती. हातकणंगलेमध्ये सत्यजित पाटील, पालघरमध्ये भारती कामडी व जळगावात भाजपमधून आलेले करण पवार यांना संधी दिली.
नाशिकचे हेमंत गोडसे, हातकणंगलेचे धैर्यशील मानेंवरही टांगती तलवार…
शिंदेसेनेचे नाशिकचे दहा वर्षांपासूनचे खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांना उमेदवारी देण्याच्या महायुतीत हालचाली सुरू आहेत. हातकणंगलेत खासदार धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर झाली, पण स्थानिक भाजपतून त्यांच्या नावाला तीव्र विरोध आहे. त्यामुळे त्यांचेही तिकीट कापण्याच्या हालचाली सुरू आहेत.