डॉ. सतीश केळशीकर यांची ठाणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी नवीन जबाबदारी
ठाणे (प्रतिनिधी) टायगर ग्रुप ठाणे शहर उपाध्यक्ष , ह्युमन राईट्स राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ.सतीश केळशीकर यांचा शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांसह आज आमदार संजय केळकर, ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर प्रवेश केला. ठाणे शहरात सुरू असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या यशस्वी वाटचालीस प्रेरित होऊन, दिवा शहरातील डॉ सतीश केळशीकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. सोबतच पक्षाने डॉ. सतीश केळशीकर यांची ठाणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.
या याप्रसंगी तरुण मिश्रा, संजय सिंग, रविराज बोटले, दत्तात्रय कोलते, नवनाथ देशमुख, तेजस पास्ते, मयूर जाधव , कमलेश पाटील, प्रशांत गायकवाड, सत्यप्रकाश मिश्रा प्रशांत डावरुग, संगीता माळी, सुषमा देवरुखकर ,अनिता नांदगावकर साक्षी नांदगावकर, समिती घाग सुषमा कोलते , पूनम कोलते,प्रज्ञा घात, नीलू मिश्रा, माधुरी पाटील असे असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
या प्रवेशासाठी ठाणे शहर संघटक सरचिटणीस विलासजी साठे साहेब, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर , दिवा मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत यांनी मोलाची भूमिका बजावली.आजच्या पक्षप्रदेशाच्या कार्यक्रमास ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार, ठाणे जिल्हा कार्यकारी सदस्य गणेश भगत, विजय भोईर, ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सारंग मेढेकर , मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील, सपना भगत, व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर, डॉक्टर सेल अध्यक्ष विद्यासागर दुबे ,मंडळ उपाध्यक्ष निलेश भोईर, उ. भा. मोर्चा सरचिटणीस अवधराज राजभर आशिष पाटील, सुमित मढवी, विपीन भोईर,प्रतिष साळुंके, आदी मान्यवर उपस्थित होते.