रायगड : युवकांना हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपयांची लूट करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. असाच एक प्रकार कोकणात रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे घडला आहे. अलिबाग येथील तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याची व्हिडिओ क्लिप तयार केली. ब्लॅकमेल करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एक महिला व पुरुषाला अलिबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अवघ्या चोवीस तासात फिल्मी स्टाईल सापळा रचून मुंबई येथून आरोपींना अटक केली आहे.
या घटनेतील फिर्यादी युवकाला अनेकदा संशयित आरोपी फोन करून पैशाची मागणी करीत होते. त्यामुळे तो मानसिक तणावात होता. ११ फेब्रुवारी रोजी फिर्यादीला फोन करून आरोपींनी पाच लाखांची रक्कम आणण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार आरोपींना मुंबईत बोलावण्यात आले होते. पोलीसही साध्या वेषात त्याच्या आजूबाजूला पाळत ठेऊन होते.
जागा बघण्याच्या उद्देशाने आलेली महिला, जागा न बघता आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढून त्याला कॉटेजवर घेऊन गेली. तिथे दोघांनी मज्जा केली आणि तिथेच त्याचा घात झाला. मोहजाळात अडकलेल्या तरुणाकडे पाच लाखाची खंडणी मागून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना अलिबाग तालुक्यात घडल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या
अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजीव पाटील आणि पोलीस कर्मचारी यांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला.
पाच लाख रुपये कुठे घेऊन यायचे, ते संशयित आरोपी धनश्री फिर्यादीला सतत फोन करून सांगत होती. अखेर चर्चगेट रेल्वे स्टेशनवर भेटायचे ठरले. त्यानंतर काही वेळाने महिलासुद्धा चर्चगेट रेल्वे स्टेशन येथे आल्याचे लक्षात आले. पोलीस पथके देखील त्यांच्या मागे जाऊन स्टेशन परिसरात सापळा रचून लक्ष ठेवून होती. चर्चगेट रेल्वे स्टेशन येथील परिसरात काही वेळानंतर संशयित महिला फिर्यादीला भेटून अज्ञात आरोपी येण्याची वाट बघण्याचे नाटक करू लागली. थोड्या वेळाने या महिलेचा भाचा तिथे आला. त्याने महिलेच्या सांगण्यावरून फिर्यादीकडून पैशांची पिशवी स्वीकारली. तो जाण्यास निघाला असता पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर महिलेच्या भाच्याचा या गुन्ह्यात सहभाग नसल्याचे पोलिसांना लक्षात आले.
जाहिरात :