मुंबई अहमदाबाद महामार्गावर डहाणूतील चारोटी इथं हा भीषण अपघात झाला
पालघर : पुणे-नाशिक महामार्गावर अपघाताची घटना ताजी असताना पालघरमध्ये अपघाताची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भरधाव कंटेनरने एका दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अहमदाबाद महामार्गावर डहाणूतील चारोटी इथं हा भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने ट्रिपल सीट असलेल्या बाईकस्वारांना चिरडलं. अपघातात 3 बाईकस्वारांचा जागीच मृत्यू झाला. चारोटी एशियन पेट्रोल पंप जवळ ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्यानंतर बाईकसह बाईकस्वारांना 100 मीटरपेक्षा अधिक अंतर फरफटत नेलं.
तिन्ही बाईकस्वार तलासरी येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही तरुणाचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शासकीय रुग्णालयात हलवले आहे. कंटेनर चालकाचा शोध घेतला जात आहे.
जाहिरात :